शिरूर : चौफुला एटीएम चोरीप्रकरणी नेमले तपास पथक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

चौफुला (पिंपळे-जगताप, ता.शिरूर) येथील एटीएम फोडून २१ लाख ७४ हजारांची रोकड पळविण्याचा प्रकार काल (ता.०५) रोजी पहाटे झाल्यानंतर चोरट्यांच्या शोधासाठी फौजदार राजेश माळी यांचे पथक तात्काळ नेमल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली. दरम्यान या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात महत्वपूर्ण माहिती हाती लागल्याने आरोपी लवकरच हाताला लागतील अशी माहिती श्री माळी यांनी दिली.

शिक्रापूर - चौफुला (पिंपळे-जगताप, ता.शिरूर) येथील एटीएम फोडून २१ लाख ७४ हजारांची रोकड पळविण्याचा प्रकार काल (ता.०५) रोजी पहाटे झाल्यानंतर चोरट्यांच्या शोधासाठी फौजदार राजेश माळी यांचे पथक तात्काळ नेमल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली. दरम्यान या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात महत्वपूर्ण माहिती हाती लागल्याने आरोपी लवकरच हाताला लागतील अशी माहिती श्री माळी यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल गुरुवारी (ता.०५) पहाटे चारच्या सुमारास एका मारुती-इर्टिका गाडीतून चौघांनी येवून केवळ पंधरा मिनीटात चौफुला येथील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांच्या इमारतीत असलेले एटीएम फोडून २१ लाख ७४ हजार १०० रुपये एवढी रोकड पळविली. याबाबत एटीएम सेंटर असलेल्या आयडीबीआय बॅंकेचे प्रतिनिधी रोहन चावडी पांडे (वय ३७, रा.वाघोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करताच एटीएम सेंटरचे समोर, चौफुला चौकात तसेच शेजारील काही दुकानांच्या बाहेरील सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसून आले असून चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटिव्हीला काळे फासल्याने चोरीची घटना स्पष्ट दिसू शकलेली नाही.

बारामतीच्या पोलिसांकडून धडाडीच्या कामगिरीची अपेक्षा

मात्र चोरीनंतर आणि चोरीआधी या गाडीचा प्रवास कसा झाला. शिक्रापूरच्या दिशेने ते कसे गेले व पुढील त्यांचा प्रवासही पुढील काही सीसीटिव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून चोरट्यांची प्राथमिक माहितीही तपासात निषन्न झाली आहे. याबाबत लवकरच चारही चोरट्यांचा शोध लागेल व त्यांना आम्ही जेरबंद करु असा दावा तपास अधिकारी राजेश माळी यांनी सकाळशी बोलताना केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigation team appointed in Chaufula ATM theft case