चोरीला गेलेल्या वाहनांच्या तपासाला मिळणार वेग

Vehicle-Theft
Vehicle-Theft

पुणे - चोरीला गेलेल्या वाहनांच्या तुलनेत तपासाचे प्रमाण अत्यल्प आहे. हे चित्र बदलण्यासाठी चोरीच्या वाहनांचा तत्काळ शोध घेण्यासाठी वाहनचोरी विरोधी पथक पुन्हा एकदा कार्यरत झाले आहे. हे पथक पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यान्वित केल्याने वाहनचोरी झालेल्या नागरिकांना आपले वाहन परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरामध्ये वाहनचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी काही वर्षांपूर्वी पुणे पोलिस दलामध्ये वाहनचोरी पथकाची निर्मिती करण्यात आली होती. संबंधित पथकाने चांगला जम बसविण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मागील वर्षी ते पथक बरखास्त करण्यात आले. दरवर्षी एक ते दीड हजार वाहने चोरीला जात असताना, पाचशे ते सहाशेच वाहने पुन्हा मिळून येत होती. आलिशान गाड्यांचा शोध तत्काळ घेतला जातो. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या कार, दुचाकी वाहनांचा शोध घेण्यास पोलिस अनुत्सुक असल्याचे नागरिकांचे अनुभव आहेत. गुन्हे शाखेच्या अन्य पथकांकडून मागील वर्षी चोरी गेलेल्या वाहनांचा शोध घेण्यात आला. तसेच, चोरीची वाहने त्यांच्या मूळ मालकांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिली. त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.

वाहनचोरी पथकाला चांगल्या ‘टीम’ची गरज
वाहनचोरीच्या घटना रोखण्याबरोबरच चोरीला गेलेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी चांगले पोलिस अधिकारी व कर्मचारी लागणार आहेत. अशा गुन्ह्यांत चांगले काम करणाऱ्या पोलिसांचा समावेश या पथकात झाल्यास वाहनचोरीच्या घटनांचा लवकर उलगडा होऊ शकतो, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी असेल पथकाची कार्यपद्धती

  • वाहनचोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणे
  • वाहनचोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे
  • वाहनचोरी होणार नाही, याची दक्षता घेणे
  • तांत्रिक पद्धतींचा वापर करून वाहनांचा शोध घेणे

वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करून अशा घटनांना आळा बसावा, याच हेतूने वाहनचोरी पथक पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या पथकासाठी वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केलेल्या चांगल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांच्याकडील ज्ञान, क्षमता ओळखून नियुक्ती करण्यात येणार आहे.
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com