गुंतवणुकीसाठी फ्लॅटला मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पिंपरी - शहरी भागातील नागरिक गुंतवणूक करण्यासाठी फ्लॅटला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जमिनीपेक्षा फ्लॅटला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी फ्लॅटच्या मागणीमध्ये २० ते २५ टक्‍क्‍यांची वाढ होत असल्याचे समोर आले आहे. 

काही वर्षांपूर्वी जमीन घेऊन त्यावर घर बांधायला प्राधान्य दिले जायचे. मात्र, आता शहरी भागात जमीनच उपलब्ध नाहीत, त्यामुळे फ्लॅट घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. 

शहरात मोशी, चिखली, चऱ्होली, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, बालेवाडी या भागांत टाऊनशिप उभ्या राहात आहेत. सर्वसामान्यांची गरज ओळखून अनेकांनी छोट्या आकाराचे फ्लॅट तयार केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून फ्लॅटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे नोंदणी विभागातील सूत्रांनी सांगितले. 

पर्याय कोणते? 
वन बीएचकेचे फ्लॅटचे प्रमाण १५वर्षांपूर्वी खूप होते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक स्कीम करताना असे फ्लॅट आवर्जून काढायचे. मध्यंतरी हे प्रमाण कमी होऊन टू बीएचकेच्या फ्लॅटवर सर्वाधिक भर होता. आता पुन्हा एकदा वन बीएचकेचा ट्रेन्ड वाढू लागला आहे. त्यात विविध प्रकारचे फ्लॅट उपलब्ध झाल्याने रिअल इस्टेट उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. वन बीएचके फ्लॅटमध्ये गुंतवणूक आर्थिकदृष्ट्या परवडणारी असल्याने अनेकांचा ओढा त्याकडेच आहे. 

ग्रामीण भागात टाऊनशिप 
पिंपरी-चिंचवडलगत असणाऱ्या चाकण, तळेगाव, मावळ या भागांत टाउनशीप उभ्या राहू लागल्या आहेत. शहरापासून दूर जाण्यास इच्छुक असणारे या ठिकाणी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. 
गुंतवणूक शहराबाहेर फ्लॅटऐवजी जमिनीत गुंतवणूक करणारी मंडळी शहरालगतच्या ग्रामीण भागाला प्राधान्य देत आहेत. 

सध्या सातारा, कराड, कोल्हापूर शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागात अशा प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

राज्याच्या नोंदणी विभागाला एक एप्रिलपासून आतापर्यंत विविध प्रकारच्या दस्तनोंदणीतून तीन हजार ३४४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नोंदणी विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात अधिक सुलभता आहे.
- अनिल कवडे, महानिरीक्षक, नोंदणी आणि मुद्रांक विभाग

Web Title: investment flat demand increase