भिडे पुलावरील लोखंडी कठडे गेले वाहून

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मुठा नदीत पाणी सोडण्यापूर्वी दरवर्षी बाबा भिडे पुलावरील लोखंडी पाईप काढून ठेवले जातात, पण यावर्षी हे पाईप न काढल्याने पुराच्या तडाख्यात कठडे वाहून गेल्याचे समोर आले आहे.

पुणे : मुठा नदीत पाणी सोडण्यापूर्वी दरवर्षी बाबा भिडे पुलावरील लोखंडी पाईप काढून ठेवले जातात, पण यावर्षी हे पाईप न काढल्याने पुराच्या तडाख्यात कठडे वाहून गेल्याचे समोर आले आहे. 

गेल्या दोन आठवड्यापासून पुणे शहर व धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. चारीही धरणे १०० टक्के भरल्याने खडकवासल्यातून पाणी सोडले. ३० जुलैला विसर्ग वाढल्याने भिडे पुल पाण्याखाली गेला. त्यावेळी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून हे पाईप काढलेले नव्हते. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ भिडे पुल पाण्याखाली होता. शुक्रवारी पुलावरील पाणी ओसरल्यावर भिडे पुलाचे लोखंडी पाईप, कठडे वाहून गेल्याचे समोर आले. काही पाईपला मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने ते पाईप वाहून न जाताच तथेच पडले होते.

महापालिकेचे अधिकारी श्रीनिवास बोनाला म्हणाले, ''पावसापुर्वी कठडे काढण्याचे काम घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालयकडून केले जाते. 
दरम्यान क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The iron pillars on the bhide bridge has been flown away in Mutha River