आयटी, बँकिंगला ‘अच्छे दिन’

रोजगाराच्या अनेक संधी; पूर्ण लसीकरणानंतर परिस्थिती सुधारणार
job vacancies
job vacancies sakal media

पुणे : वस्तूंचे उत्पादन आणि आयटी या दोन क्षेत्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वाधिक नोकऱ्या पुरविल्या जातात. त्यातील ऑटोमोबार्इलमधील नोकऱ्यांना तूर्तास ब्रेक लागला असला, तरी आयटी तसेच बँकिंग, सेवा, रिटेल, पर्यटन या क्षेत्रांतील नोकरदारांना पुन्हा ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत. त्यामुळे या क्षेत्रांत आता रोजगाराच्या संधी निर्माण होवू लागल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांतील नोकऱ्यांची स्थिती बदलली. मात्र, आता त्यात पुन्हा सुधारणा होत आहे. त्यामुळे आयटी, बँकिंग, सेवा, रिटेल, पर्यटन क्षेत्रातही फ्रेशरपेक्षा अनुभव असलेल्यांना रुजू करून घेतले जात आहे.

याबाबत ग्रॅव्हिटी कन्सटंट्सचे भानुदास थोरात म्हणाले, ‘‘कोरोनापुर्वी दिवाळी झाल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत अनेक कंपन्यांमध्ये नवीन नोकऱ्या उपलब्ध होत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. यंदा कंपन्यांकडून २०१९ च्या तुलनेत कमी प्रमाणात कर्मचाऱ्यांची मागणी होती. मात्र, आयटी, बँकिंग, सेवा, रिटेल, टुरिझममध्ये संधी निर्माण होत आहेत. कोरोनाचा सर्वच प्रकारच्या बाजारपेठांवर परिणाम झाल्याने ही परिस्थिती आहे. कोरोनाचे रुग्ण आणखी कमी होऊन लसीकरण वाढेल, तशी ही परिस्थिती सुधारू शकेल. नोकरीवर रुजू होताना कर्मचाऱ्याने आणि रुजू करून घेताना कंपनीने एकमेकांना समजून घ्यायला हवे.’’

हॉटेल व्यवसायात रोजगार संधी

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे अडीच लाख हॉटेल कामगार होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या क्षेत्रातील कामगारांची संख्या दोन लाखांपर्यंत खाली आली. मात्र, आता सर्वच प्रकारचे हॉटेल सुरू झाल्याने येथील रोजगार वाढत आहे. काही ठिकाणी नवीन हॉटेल्सही सुरू होत आहेत.

मी कामाला असलेले हॉटेल कोरोनामुळे तब्बल दीड वर्ष बंद होते. त्या काळात मला दुसरी नोकरीदेखील मिळाली नाही. त्यामुळे घरी बसून होतो. मात्र, आता पुन्हा हॉटेल सुरू झाल्याने कामावर रुजू झालो आहे. इतर ठिकाणीही काम करण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

- अखिलेश निधाने, सेवा क्षेत्रातील कामगार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com