आयटी कंपन्यांच्या वेळा बदला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांनी कामांच्या वेळेत बदल करून सकाळी सात आणि नऊ वाजता कराव्यात, अशी मागणी हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडेंट ट्रस्टकडून करण्यात आली आहे. 

कंपन्यांनी वेळेत बदल केल्यानंतर या भागातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. दुचाकी, मोटार, रिक्षा यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका, कॅब सेवेसाठी फास्ट लेन करण्याचा प्रस्ताव यांनी ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भातील अहवाल पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांना पाठविला आहे. 

वाहतूक पोलिसांनी चक्राकार वाहतुकीचा प्रयोग सुरू केल्यानंतर ट्रस्टने या परिसराचे सर्वेक्षण केले होते. त्यात वाहतुकीच्या संदर्भातील व्हिडिओ, वाहतुकीची आकडेवारी जमा करण्यात आली होती. त्यात सकाळी नऊ ते अकरा या वेळेत वाहनांचा ओघ अधिक असल्याचे आढळले. सकाळी सात ते साडेआठ यामध्ये वाहनांची संख्या कमी असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आयटी कंपन्यांनी कामाच्या वेळा सकाळी सात आणि नऊ वाजता केली. या भागातील वाहतुकीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचे निरीक्षण या ट्रस्टकडून नोंदवण्यात आले आहे. आयटी पार्क परिसरात दुचाकी आणि मोटारी शेअरिंगचा प्रयोग राबविला जावा, त्याचप्रमाणे फेज तीन ते वाकडदरम्यान शटल बससेवेचा उपक्रम राबविला गेला. येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

हिंजवडीतील वाहतूक व्यवस्था सुधाराव्यात, यासाठी हिंजवडी एम्प्लॉइज अँड रेसिडेंट ट्रस्टकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहतुकीच्या संदर्भात तयार केलेला सर्वेक्षणाचा अहवाल गेल्या शुक्रवारी पोलिस आयुक्‍तांना दिला आहे. या सर्वेक्षणाचा अभ्यास करून त्यामध्ये पोलिसांना आवश्‍यक असणाऱ्या बाबींची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्‍तांनी दिले आहे. 
- ज्ञानेंद्र हुलसुरे, अध्यक्ष, हिंजवडी एम्प्लॉइज अँड रेसिडेंट ट्रस्ट.

Web Title: IT Company Time Table