आयटी इंजिनिअरची ऑनलाइन फसवणूक

Online Cheating
Online Cheating

पुणे - विमानाच्या तिकिटाचे पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने आयटी इंजिनिअरच्या बॅंक खात्यातून 80 हजार रुपये ऑनलाइन परस्पर काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी 45 वर्षीय (रा. महंमदवाडी) व्यक्तीने फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आयटी इंजिनिअर आहेत. त्यांनी विमानाचे तिकीट काढले होते. ते रद्द करून त्याचे पैसे त्यांना परत मिळवायचे होते. त्यांना यासंदर्भात एका अनोळखी व्यक्तीने फोन करून मेकबाय ट्रिप या कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. विमानाचे तिकिटाचे पैसे परत हवे असतील तर ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले.

फिर्यादी यांनी ऍप डाऊनलोड करताच त्यांच्या बॅंक खात्यातून चार वेळा ऑनलाइन व्यवहार होऊन 80 हजार रुपये काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com