सिंहगड घाटातील दरडींची 'आयआयटी'च्या तज्ज्ञांनी पाहणी करावी

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 15 जुलै 2018

वन अधिकाऱ्यांवर नाराजी
मागील रविवारी दि 8 जुलै रोजी दरड पडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी गडावर पाहणी करण्यासाठी आले नाहीत. आज ही आले नाहीत.  याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. सहायक उपवनसंरक्षक महेश भावसार यांना फोन करून भांबुर्डांचे वन परिक्षेत्र अधिकारी पवार हे देखील आले नाहीत. दरड पडल्यामुळे गडावर दुचाकीने स्थानिक नागरिक, वडाप मधून काही पर्यटक गडावर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत, कोणत्या गाड्या जातात कोण ऐकत नसल्यास थेट मला फोन करा. वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळवा. 

पुणे : सिंहगड घाट रस्त्यात उबरदांड या ठिकाणी आठवड्यात दोनदा दरड पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून या ठिकाणी येऊन पाहणी करून घ्यावी. अशी सूचना आमदार भीमराव तापकीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. 

तापकीर यांनी शनिवारी संध्याकाळी दरड पडलेल्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, "दरडीपासून संरक्षणासाठी एक कोटी 62 लाख रुपयांचा निधीचे काम पूर्ण झाले. पुढील टप्प्यातील जाळ्या बसविण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या वनविभागाच्या उपक्रमातून एक कोटी 25 लाख रुपयांचा निधीला मान्यता मिळाली आहे. ते काम पावसाळ्यानंतर सुरू होईल. आयआयटी मुंबई यांनी यापूर्वी 16 ठिकाणी गरज पडण्याची शक्यता दिली होती. त्या ठिकाणी सुद्धा जाळी व अन्य कामांसाठी निधी द्यावा. अशी मागणी दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. असे ही तापकीर यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. 

दरड पडलेली असताना रस्ता वाहतुकीला बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. असे त्यांनी यावेळी सांगितले. दरड पडली असल्याने गडावरील वाहतूक सुरू करू नये. अशी सूचना त्यांनी वनविभाग, हवेली पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी केल्या आहेत. 

वन अधिकाऱ्यांवर नाराजी
मागील रविवारी दि 8 जुलै रोजी दरड पडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी गडावर पाहणी करण्यासाठी आले नाहीत. आज ही आले नाहीत.  याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. सहायक उपवनसंरक्षक महेश भावसार यांना फोन करून भांबुर्डांचे वन परिक्षेत्र अधिकारी पवार हे देखील आले नाहीत. दरड पडल्यामुळे गडावर दुचाकीने स्थानिक नागरिक, वडाप मधून काही पर्यटक गडावर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत, कोणत्या गाड्या जातात कोण ऐकत नसल्यास थेट मला फोन करा. वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळवा. 

गडावर वडाप, खासगी गाड्या जात असल्यायाबाबत त्यांनी हवेली पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांना देखील त्यांनी विचारणा केली. स्थानिक वडाप करणारी वाहने नागरिक वनविभागाला जुमानत नाहीत. याठिकाणी हवेली पोलिसांनी बंदोबस्त ठेवावा. अशा सूचना हवेलीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना केले आहेत. दरड पडलेली रस्ता 8- 10 वाहतुकीला बंद राहील. त्यामुळे हौशी पर्यटकांनी आतकरवाडीतून पायवाटेने गडावर जावे. तापकीर यांनी केले आहे.  

Web Title: it expert survey landslide in Singhgad ghat