चित्रपटांच्या तांत्रिक बाबींकडे लक्ष द्यायला हवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

पुणे - ऑस्करसाठी गेलेल्या भारतीय चित्रपटांच्या भाषांतरासारख्या तांत्रिक गोष्टींकडेही भारतीय चित्रपटसृष्टीने लक्ष द्यायला हवे. सबटायटल्सवर निर्माता आणि दिग्दर्शकांनी अजून काम करायला हवे; तसेच भारतीय चित्रपटांतील गाण्याचे भाषांतरही हास्यास्पद होते. त्याकडे गांभीर्याने पाहून जर फक्त गीताचा आशय दिला, तर त्याचा परिणाम जास्त चांगला होईल, असे मत ऑस्करच्या निवड समितीवर ज्युरी म्हणून निवड झालेले पहिले भारतीय उज्ज्वल निरगुडकर यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून ‘सांस्कृतिक कट्टा’ या कार्यक्रमाअंतर्गत निरगुडकर यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी ऑस्करसंबंधी अनभिज्ञ असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. आपल्याकडील चित्रपटांची सबटायटल ब्रिटिश इंग्रजीनुसार असतात. त्यामुळे चित्रपट अमेरिकेत तेवढ्या तीव्रतेने पोचत नाही. 

जगभरात चित्रपट पोचण्यातही अडचणी येतात; तसेच ऑस्करच्या नामांकनासाठी त्यातील सगळ्या संधी अनेकांना माहिती नाहीत. त्याविषयीही जागृती व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

ऑस्कर-मधील ज्युरींना भारतीय प्रादेशिक चित्रपट जास्त भावतात. भारतातील सामाजिक विषय, भारतीय मातीचा सुगंध असलेले आणि भारतात चित्रीकरण केलेल्या विषयांना जास्त प्राधान्य मिळते. त्यामुळे जर भारताला ऑस्कर मिळाले तर प्रादेशिक चित्रपटांना मिळेल, असे ते म्हणाले. 
भारतीय निर्माता आणि दिग्दर्शकांना ऑस्करची प्रक्रिया जास्त सोयीची जावी म्हणून ऑस्कर ॲकॅडमीचे ऑफिस मुंबईत सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे इथल्या निर्माता, दिग्दर्शकांचे ऑस्करशी निगडित असलेले अनेक प्रश्‍न सुटतील. महत्त्वाची बाब म्हणजे भारताप्रमाणे अमेरिकेत सेन्सॉर बोर्डावर सरकारचे नियंत्रण नाही; परंतु भारताच्या परंपरेमुळे जगभरात अनेकांना भारताविषयी आणि भारतीय चित्रपटसृष्टीविषयी आकर्षण आहे. चित्रपटाशी निगडित असलेल्या अनेक परदेशी व्यक्‍ती भारताबद्दल आणि चित्रपटसृष्टीबद्दल कुतूहलाने विचारपूस करतात, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: It is important to pay attention to the technical aspects of the films