#ITJob अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ‘आयटी’ची ‘क्रेझ’

प्रवीण खुंटे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे - माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी अधिक असल्याने त्याकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वार्षिक सरासरी १२ ते ३९ लाखांचे पॅकेज महाविद्यालयातून बाहेर पडताना प्लेसमेंट सेलद्वारे मिळत आहेत. यासोबतच यांत्रिकी, विद्युत, इलेक्‍ट्रॉनिक, सिव्हिल, ऑटोमोबाईल, पेट्रोलियम आदी अभियांत्रिकीच्या क्षेत्रांमध्येही नोकरीच्या संधी आहेत. यातील विद्यार्थ्यांना ४.५ ते २० लाखांपर्यंतच्या नोकऱ्या मिळत आहेत. 

पुणे - माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी अधिक असल्याने त्याकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वार्षिक सरासरी १२ ते ३९ लाखांचे पॅकेज महाविद्यालयातून बाहेर पडताना प्लेसमेंट सेलद्वारे मिळत आहेत. यासोबतच यांत्रिकी, विद्युत, इलेक्‍ट्रॉनिक, सिव्हिल, ऑटोमोबाईल, पेट्रोलियम आदी अभियांत्रिकीच्या क्षेत्रांमध्येही नोकरीच्या संधी आहेत. यातील विद्यार्थ्यांना ४.५ ते २० लाखांपर्यंतच्या नोकऱ्या मिळत आहेत. 

सध्या महाविद्यालयात प्लेसमेंट सेलमध्ये अनेक राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्या येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हुरूप वाढत आहे. माहिती जमा करणे, तिचे विश्‍लेषण आणि त्याच्या वापरासाठी काम करणाऱ्यांची जास्त गरज आहे. आज ज्याच्याकडे अधिक माहितीचे संकलन आहे, त्याला व्यवसायात यशस्वी होण्याची सर्वांत जास्त संधी असल्याचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील जाणकारांचे म्हणणे आहे. ‘डेटा’ हा विकासाचे ‘फ्युएल’ असल्याचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. उत्तम चासकर यांनी सांगितले.

जपानमध्ये नोकरीच्या अधिक संधी
अभियांत्रिकीची पदवी आणि जापनीज भाषा येणाऱ्या तरुणांना जपानमध्ये नोकरीच्या अनेक संधी आहेत. जपानमध्ये तरुणांची संख्या कमी आहे. मात्र, ते तंत्रज्ञानाच्याबाबतीत अधिक प्रगत आहेत. तेच तंत्रज्ञान सांभाळणे आणि नवीन निर्माण करण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांची गरज आहे. मागील वर्षभरात हिरोमेकी सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ६० ते ६२ तरुणांना जपानमध्ये नोकरी मिळवून देण्यास आम्ही यशस्वी झालो आहोत. वर्षाला किमान १५ ते ४० लाख रुपये पगाराच्या कायमस्वरूपी नोकरीच्या संधी तिथे आहेत, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक जपान भाषा विभागाचे प्रा. प्रज्वल चन्नागिरी यांनी सांगितली.

या वर्षअखेर झालेल्या प्लेसमेंट
 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) - सरासरी ६५ टक्के; आयटी विद्यार्थ्यांच्या ९० प्लेसमेंट
 आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एआयटी) - सरासरी ८२ टक्के; आयटीची संख्या जास्त
 एमआयटी - दर वर्षी ८५ टक्के प्लेसमेंट; या वर्षापर्यंत ६०० जणांना नोकऱ्या. 
 मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग - सरासरी ४५ टक्के; आयटी ६० टक्के. वर्षपूर्ण होईपर्यंत ८० टक्के

‘सीओईपी’मधील बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच. यात माहिती-तंत्रज्ञान शाखेतील ९० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतील.
- डॉ. उत्तम चासकर, प्लेसमेंट विभाग प्रमुख, सीओईपी

अधिक क्षमता असणाऱ्या मुलांना नोकरी मिळविण्यास अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत; परंतु मध्यम बुद्धीच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो. उद्योगक्षेत्रांत वाढलेल्या अपेक्षांमुळे कौशल्यपूर्ण तरुणाला लवकर स्वीकारले जाते.
- प्रा. मनोज खालडकर, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी

मला मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये वार्षिक ३९ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. चौथ्या वर्षाच्या सुरवातीला दोन महिने इंटर्नशिप करण्यासाठी मिळते. यात कंपनीच्या अपेक्षा काय आहेत, याची जाणीव होते. त्याचा फायदा  होतो. 
- आकाश पाटील, विद्यार्थी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे

Web Title: IT Job Engineering Student Craze