महाविकास आघाडी करणे शक्य नाही; अजित पवारांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

  • पुणे झेडपीत महाविकास आघाडी नसेल - अजित पवार
  • चारही सभापतिपदे राष्ट्रवादी कॉंग्रेसला देणार

पुणे : राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत मात्र महाविकास आघाडी करणे शक्‍य नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या संख्या मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेला एकाही विषय समितीचे सभापतिपद देता येणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. 23) शिवसेनेचे गटनेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार नसल्याचे आणि चारही सभापतिपदे सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने, पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीतही महाविकास आघाडी करावी आणि किमान एक सभापतिपद सेनेला देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावेळी महाविकास आघाडीबाबत वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या आजी-माजी आमदार-खासदारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन पवार यांनी शिवसेनेला दिले होते. या मागणीबाबतची माहिती खुद्द पवार यांनीच पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांना दिली होती.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

दरम्यान, 11 जानेवारीला नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या होत्या. ही दोन्ही पदे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात आलेली आहेत. त्यामुळे किमान आता विषय समितीच्या सभापती निवडीत तरी महाविकास आघाडी होईल आणि सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला किमान एक तर सभापतिपद देईल, अशी अपेक्षा शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना होती. ती अपेक्षा फोल ठरली आहे.

Image result for Pune zp


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is not possible to MVA in Pune ZP says Ajit Pawar