Tea
TeaSakal

आयटी पार्क परिसरातील व्यावसायिक हवालदिल; नफ्याचे प्रमाण घटले

माझा व्यवसाय अजूनही पुर्वपदावर आलेला नाही. तसेच जो धंदा होत आहे, त्याच्यातील नफ्याचे प्रमाण महागाईमुळे कमी झाले.
Summary

माझा व्यवसाय अजूनही पुर्वपदावर आलेला नाही. तसेच जो धंदा होत आहे, त्याच्यातील नफ्याचे प्रमाण महागाईमुळे कमी झाले.

पुणे - माझा व्यवसाय (Business) अजूनही पुर्वपदावर आलेला नाही. तसेच जो धंदा होत आहे, त्याच्यातील नफ्याचे प्रमाण महागाईमुळे (Inflation) कमी झाले. पूर्वी जर ४० टक्के फायदा (Profit) होत असेल तर तो आता १५ टक्‍क्‍यांवर आला आहे. गॅस (Gas) आणि तेलाच्या (Oil) किमती वाढल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे... अशी व्यथा प्रातिनिधीक स्वरूपात सांगत होते हिंजवडी आयटी पार्क परिसरातील हॉटेल व्यावसायिक संदीप अडतरे...

वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे अजूनही अनेक आयटीयन्स त्यांच्या मूळ गावी आहेत. तसेच पुण्यात असले तरी त्यांचा घरून काम करण्यावर भर आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या विविध प्रकारच्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

पीजीमध्ये अनेक रुम रिकाम्या

चहाच्या टपरीपासून अनेक मोठमोठी हॉटेल शहरातील हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, बावधन, रावेत, औंध, विमाननगर, खराडी, मगरपट्टा येथील आयटी हबमध्ये आहे. त्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू, जीवनावश्यक बाबींचे दुकाने, मिठाई, लॉन्ड्री आणि पेयिंग गेस्ट (पीजी) असे विविध व्यवसाय आयटीयन्सवर अवलंबून आहे. मात्र त्यांच्या व्यवसायावर कोरोना आणि वर्क फ्रॉम होममुळे ३० ते ५० टक्के परिणाम झाला आहे. संध्याकाळी पाय ठेवायला जागा नसलेल्या चहाच्या टपरीसमोर तुरळक गर्दी होत आहे. उत्पन्नाचा चांगला पर्याय म्हणून सुरू केलेल्या पीजीमध्ये सध्या अनेक रुम रिकाम्या आहेत.

परिणाम करणारी कारणे

  • अनेक आयटीयन्स घरून काम करीत आहेत

  • प्रतिसाद मिळत नसल्याने दैनंदिन खर्च भागवणे अवघड

  • हायब्रीड पद्धतीचे वर्ककल्चर

  • शनिवार आणि रविवारी घरीच थांबण्याची मानसिकता

  • अनेक बाबी ऑनलाइन ऑर्डर करणे

  • अनलॉकनंतर वाढलेली महागाई

व्यवसायांना आर्थिक फटका

  • हॉटेल

  • पीजी

  • स्वीट मार्ट

  • लॉन्ड्री व्यवसाय

  • भाजीपाला वितरण

  • खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल

कोरोनाकाळात आठ महिने मी मुळ गावी गेला होतो. या काळात माझा व्यवसाय पुर्ण बंद होता. मात्र माझे घरभाडे आणि इतर खर्च सुरूच होता. आम्ही पती-पत्नी आणि तीन मुले असा माझा परिवार पाणीपुरीच्या व्यवसायावर अवलंबून आहोत. काही दिवसांपूर्वी मी पुन्हा स्टॉल सुरु केला. मात्र, आता ५० टक्के व्यवसायही होत नाही.

- लालसिंग बघेल, पाणीपुरी विक्रेता, हिंजवडी, फेज तीन

कोरोनामुळे मी दोन वर्ष उशिरा रेस्टॉरंट सुरू केला. त्यामुळे सर्व तयारी झालेली असतानाही दोन वर्ष व्यवसाय करता आला नाही. आता व्यवसाय सुरू केला, मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. आठवड्यातून तीनच दिवस कर्मचारी ऑफिसला येत असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे

- निशांत गुजर, रेस्टॉरंट चालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com