आयटीपार्कमध्ये सहापदरी रस्ते

IT-park-Road
IT-park-Road

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधे होणाऱ्या वाहतूक कोंडीची कायम चर्चा होत असते. येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंतर्गत रस्त्याच्या कनेक्‍टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घेतला आहे. विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कल आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनकडे जाणारे दोन रस्ते सहा पदरी करण्यात येणार असून लवकरच कामाला सुरवात होणार असल्याचे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

आयटी पार्कमधल्या फेज दोनमधील विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यानचा रस्ता चार पदरी आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी येथे वाहनांच्या रांगा लागतात. 

येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये अनेक आयटी कंपन्यांचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. सध्या हा रस्ता चार पदरी आहे. मात्र, भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करून फेज तीनमधून स्पेशल इकॉनॉमिक झोनकडे जाणारा रस्ता सहा पदरी करण्यात येणार आहे. फेज तीनमधून येणारे आयटीयन्स इन्फोसिस सर्कल, विप्रो सर्कल या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे. 

आयटी पार्कमधील वाहनांच्या संख्या विचारात घेता या परिसराचे सर्व्हेक्षण करून एमआयडीसीने अरुंद रस्त्यांच्या रुंदीकरणाचेही काम करावे. त्यामुळे या परिसरातील अंतर्गत कनेक्‍टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार असल्याचे अभियंता केदार तुंगीकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com