सर्वच पातळ्यांवर ज्येष्ठांची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी

समीर तांबोळी
मंगळवार, 19 जून 2018

उंड्री पुणे - आयुष्यभर ज्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत तरूण पिढीला जगण्याचे बळ दिले, अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतरत़्या वयात आदर आणि आसरा देऊन त्यांचे आयुष्य सुखकर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी सामाजिक, शासकीय आणि धोरणात्मक अशा सर्वच पातळींवर प्रयत्न झाले पाहिजे, असा सूर विविध क्षेत्रातील तज्ञांनी 'ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध आणि जनजागृती' या विषयावरील परिसंवादात व्यक्त केला. 

जनसेवा फाऊंडेशन, पुण्यधाम आश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध आणि जनजागृती' या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, आमदार निलम गोऱ्हे, विविध संस्थांचे पदाधिकारी  उपस्थित होते. शहरातील विविध १५० सामाजिक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी बोलताना डॉ. विजय भटकर म्हणाले, देशाला सुदृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे तरूणाईची गरज आहे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचीही गरज आहे. तरूणाईचा उत्साह आणि ज्येष्ठांचा अनुभव यांच्या साथीने देशाच्या विकासाला योग्य दिशा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांचे महत्व ओळखून त्यांना आदरपूर्वक वागणूक दिली पाहिजे.

यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, जेष्ठ नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्येक वेळी आपण जिवंत आहोत, याचा दाखला द्यावा लागणे ही अतिशय खेदजनक बाब आहे. समाजकल्याण विभागाने बँकांशी लिंक अप करून ही जाचक अट बदलता येईल का यासाठी प्रयत्न करावा.

यावेळी बोलताना डॉ. विनोद शहा म्हणाले की, बदलती जीवन शैली आणि विभक्त कुटुंब पद्धती यांचा विपरित परिणाम सध्याच्या समाजव्यवस्थेवर दिसून येत आहे. बहुतांश घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे छळ होत आहेत. त्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. मात्र तरूणांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, तुम्ही भावी पिढीवर तुम्ही चूकीचे संस्कार करत आहात. असे असेल तर तुमच़्या उतारवयात तुम्हालाही वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जाईल. ही परिस्थिती येऊ नये यासाठी वेळीच खबरदारी घेऊन कौटुंबिक सलोखा वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. 

Web Title: It is the responsibility of the society to take care of the elderly