पुणे : सीईओ रूबल अग्रवाल यांची बदली?

rubal.jpg
rubal.jpg

पुणे : पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पुणे स्मार्टसिटी डेव्हल्पेमेंट कार्पोरेशनच्या "सीईओ' रुबल अग्रवाल यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. मात्र, अग्रवाल यांची पिंपरी-चिंवचड महापालिकेच्या आयुक्तपदावर बदली झाली आणि पदभार स्वीकारला ही अफवा असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बदली झाली नसल्याचे अग्रवाल यांनी स्वत: सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्‍यता असून, त्यात अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. 

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू होऊन अग्रवाल यांना आता पुढच्या महिन्यांत दोन वर्षे पूर्ण होतील. सध्या त्यांच्या महापालिकेतील विविध प्रमुख खात्यांची जबाबदारी आहे. तसेच पुणे स्मार्टसिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या (पीएसडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.

त्याचवेळी कोरोनाविरोधातील मोहिमेतही त्यांचा पुढाकार असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपायांसह रुग्णांसाठी नव्या सुविधा उभारणे, रुग्ण, संशयित घराबाहेर पडणार नाहीत, यासाठीचा बंदोबस्त करणे या प्रमुख कामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर बदलीची चर्चा रंगली असून, त्यानुसार नवनवे निष्कर्षही काढले जात आहेत.

त्याचवेळी पिंपरी-चिंवचड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या बदलीची दाट शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर अग्रवाल यांच्या कामांचा धडाका पाहून त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कार्यभार सोपविला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, अद्याप तशी चर्चा नाही आणि कोणता निर्णयही झाला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

परंतु, काही बदल्या होऊ शकतात हेही या अधिकाऱ्याने सूचित केल्याने अग्रवाल यांच्या बदलीच्या चर्चेला पूर्णविराम मिळत नाही. त्यापलीकडे जाऊन अग्रवाल यांनी िंपपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रेही ताब्यात घेतल्याचे व्हायरल झाले आहे. मात्र, ही निव्वळ चर्चाच असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com