मोदी येणार हे माहीत होते : अजित पवार

मोदी येणार हे माहीत होते : अजित पवार

पिंपरी (पुणे) : "देशात मोंदींची लाट होती हे निवडणूकीपूर्वी केलेल्या सर्व्हेक्षणातून माहिती झाले होते. त्यासाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, तुम्हाला हे निवडणुकीपूर्वी सांगितले नाही,'' असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यासाठी ते शहरात आले होते.

पवार म्हणाले, "नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असा निश्‍चय 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोकांनी केला होता. हे त्यावेळच्या सर्व्हेक्षणातून आम्हाला समजले होते. बालाकोटच्या हल्ल्यामुळे भारत विरूद्ध पाकिस्तान असे चित्र निर्माण झाले. पुलवामावेळी 300 किलो आरडीएक्‍स कसे आले, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, मंदी, बकाल शहरे आदींबाबत चर्चाच झाली नाही. सरकारी कंपन्या डबघाईला आल्या आहेत. त्यामुळे एमटीएनएल, बीएसएनएल रिलायन्सने विकत घेतल्यास आश्‍चर्य वाटायला नको. एअर इंडियाचेही खासगीकरण करण्याचे काम सुरू आहे. मुकेश अंबानी जगातील श्रीमंत व्यक्‍तींमध्ये वरच्या स्थानी जात आहे. देशातील मूठभर व्यक्‍ती श्रीमंत होत आहेत. मात्र, जनतेकडे कोणी बघत नाही. देशाची सूत्रे दोघांच्या हाती गेली आहेत.''

लोकसभेला तिन्ही मतदारसंघात समाधानकारक काम झालेले नाही. आगामी निवडणुकीत जुन्या नव्यांचा समन्वय साधला जाईल. भाजपचा कामापेक्षा गाजावाजाच जास्त आहे. फक्‍त ओढायचे ध्येय असल्याने त्यांच्यावर वचक कोण कोणावर ठेवणार, असा प्रश्‍न त्यांनी या वेळी उपस्थित केला. "आपले सरकार आल्यावर नगरविकास खाते आपल्याकडे असणार आहे. त्यामुळे येथे आयुक्‍त कोण द्यायचा हे आपण ठरवू. महापालिकेत वेगळा ठराव केला तर मी बघतो. नागरिकांना त्रास दिल्यास खूप काही नगरविकास खात्याच्या हातात असत. येथे चांगले पोलिस अधिकारी देऊ. वाहतूक कोंडी 100 टक्‍के सोडवू. माझ्या नावाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा. नागरिकांना कार्यकर्त्यांनी विश्‍वास दिला पाहिजे,'' असेही ते म्हणाले.

आपले तिन्ही उमेदवार निवडून आल्यावर सहा महिन्यांत शास्तीकराचा प्रश्‍न मार्गी लावू. जर प्रश्‍न मार्गी लावला नाही तर पुन्हा शहरात पाय ठेवणार नाही.
अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

अजित पवारांच्या सूचना
- पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी संघटनेला महत्त्व द्यावे
- सोशल मिडियासाठी वॉररूम तयार करा
- पदाधिकाऱ्यांनी दररोज तीन तास कार्यालयात बसावे
- पक्षाशिवाय इतर जादा जबाबदारी असणाऱ्यांना बाजूला करा
- विधानसभेची उमेदवारी देण्यापूर्वी उमेदवारांचे सर्व्हेक्षण करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com