‘आयटीआय’च्या ३० हजार जागा रिक्‍त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मेकॅनिक, इलेक्‍ट्रिशन, वेल्डर, फिटर, टेक्‍निशियन यासह अनेक प्रकारचे प्रशिक्षण ‘आयटीआय’मध्ये मिळते. यामुळे प्रशिक्षित कामगारांना चांगल्या प्रकारचा रोजगारही मिळत असल्याने अनेक जण प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. मात्र, २०१८-१९ या वर्षाच्या  प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मागील महिन्यात पूर्ण झाली. राज्यात सुमारे पावणे पाचशे आयटीआय संस्था आहेत.

पुणे - ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’तील (आयटीआय) प्रवेशाच्या २९ हजार ९५९ जागा रिक्त आहेत. यामध्ये खासगी आयटीआय संस्थांमधील २० हजार जागांचा समावेश आहे. 

मेकॅनिक, इलेक्‍ट्रिशन, वेल्डर, फिटर, टेक्‍निशियन यासह अनेक प्रकारचे प्रशिक्षण ‘आयटीआय’मध्ये मिळते. यामुळे प्रशिक्षित कामगारांना चांगल्या प्रकारचा रोजगारही मिळत असल्याने अनेक जण प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. मात्र, २०१८-१९ या वर्षाच्या  प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मागील महिन्यात पूर्ण झाली. राज्यात सुमारे पावणे पाचशे आयटीआय संस्था आहेत. त्यात शासकीय संस्थांमध्ये ९३ हजार, तर खासगीमध्ये ५५ हजार जागा आहेत. या प्रक्रियेमध्ये एकूण चार केंद्रीय प्रवेश फेऱ्या, खासगीसाठी एक संस्थास्तरावरील तर शासकीयसाठी एक समुपदेशन फेरी झाली. त्यानंतर ऑक्‍टोबरच्या शेवटी प्रवेश प्रक्रिया संपली. 

राज्यभरात १ लाख १८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, सुमारे ३० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. पुणे विभागामध्ये सर्वाधिक ३१ हजार जागा होत्या. त्यापैकी सर्वाधिक सुमारे साडेसात हजार जागा रिक्त राहिल्या, तर सर्वांत कमी २ हजार १६२ रिक्त जागा या अमरावती विभागात राहिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI 30000 seats empty