निगडीतील आयटीआयचा कायापालट

आशा साळवी
सोमवार, 14 मे 2018

पिंपरी - चाकण येथील फोक्‍सवॅगन कंपनीच्या सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून निगडी-दुर्गानगर येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआयचे) कायापालट करण्यात येत आहे. दोन कोटींचा निधी कंपनीने त्यासाठी दिला आहे. 

पिंपरी - चाकण येथील फोक्‍सवॅगन कंपनीच्या सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून निगडी-दुर्गानगर येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआयचे) कायापालट करण्यात येत आहे. दोन कोटींचा निधी कंपनीने त्यासाठी दिला आहे. 

उद्योगांना कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या आयटीआयसाठी सरकारकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नाही. त्यासाठी कौशल्य विकास विभागाने गेल्यावर्षी ‘सीएसआर’ निधीचा पर्याय पुढे आणला. त्यानुसार निगडी-दुर्गानगर येथील सरकारी आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक साहित्य, सुविधा मिळाव्यात यासाठी फोक्‍सवॅगन कंपनीने दोन कोटी रुपये दिले. कंपनीला आवश्‍यक साहित्याची माहिती दिल्यानंतर कंपनीने ते दिले.

सीएसआर उपक्रमांतर्गत आयटीआयला सुविधा पुरविण्यात येत आहेत.
- एस. आर. खडतरे, प्राचार्य शासकीय आयटीआय, निगडी  

आयटीआयमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था होती. अत्याधुनिक शौचालयामुळे मुलींची गैरसोय दूर झाली आहे.
- धनश्री उमाटे, इलेक्‍ट्रिशियन

अशा केल्या सुधारणा
    अत्याधुनिक कमोड पद्धतीचे चार शौचालये
    स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून दिला 
    ड्रॉइंग हॉलमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना नवीन पद्धतीची आसन व्यवस्था. प्रतिनग १० हजार रुपयेप्रमाणे ५० फोल्डिंग बेंच 
    प्रशिक्षणार्थ्यांसाठी दोन फिल्टर वॉटर कुलर
    वसतिगृहाची रंगरंगोटी, सर्व खोल्यांमध्ये लायटिंग फिटिंग, पंखे, एलईडी ट्यूब, बल्ब
    सीएनसी आणि व्हीएमसी या विभागातील मशिनरीजची दुरुस्ती केली 
    सीमाभिंतीची उंची वाढवली, आवारातून जाणारी पायवाट बंद केली

Web Title: ITI development