‘आयटीआय’त आंतरराष्ट्रीय ‘प्लंबिंग लॅब’

निगडी- दुर्गानगर - शासकीय आयटीआयमध्ये विकसित करण्यात आलेली प्लंबिग लॅब.
निगडी- दुर्गानगर - शासकीय आयटीआयमध्ये विकसित करण्यात आलेली प्लंबिग लॅब.

पिंपरी - पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन एवढ्यापुरतेच प्लंबिंग (नळ कारागीर) क्षेत्र मर्यादित राहिलेले नाही. तर, चांगल्या कामातून पाणी बचत होऊ शकते, या हेतूने निगडी- दुर्गानगर येथील शासकीय आयटीआयमध्ये तब्बल चार कोटी रुपयांची अद्ययावत प्लंबिंग लॅब विकसित करण्यात आली आहे. बॉश कंपनीने आपल्या सीएसआर निधीतून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) हे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. 

या लॅबसाठी तीन महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी ठेवण्यात आला असून, प्रतिबॅच २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशिक्षित प्लंबर हे शुद्ध पाणीपुरवठा आणि सांडपाण्याचे वहन व व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात. गेल्या काही वर्षांमध्ये जीवनमान उंचावल्याने ‘लक्‍झुरिअस’ या घटकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

स्टायलिश व लक्‍झुरिअस बाथरूम व टॉयलेट फिटिंगला प्राधान्य दिले जात आहे. त्यातूनच कुशल प्लंबरची गरज वाढली आहे. 

ही गरज ओळखूनच ‘बॉश चासीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने आयटीआयमधील प्लंबर विभागाच्या अद्ययावतीकरणावर भर दिला आहे. आयटीआयबरोबर संबंधित कंपनीने तीन वर्षांचा करार केला आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जा
प्लंबिंग क्षेत्रातील जग्वार, सुप्रिम, ग्रॅंडफोर्स, रोथनबर्ग या चार नामांकित कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून ही आंतरराष्ट्रीय दर्जाची लॅब विकसित करण्यात आली आहे. 

त्यातील प्लंबर ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये पारंपरिक प्लंबिंगचा एक वर्षाचा व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

प्लंबर प्रशिक्षित करून त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी ही लॅब उपयुक्त ठरणार आहे. 
- डी. एस. जगताप, प्राचार्य, शासकीय आयटीआय, निगडी - दुर्गानगर 

जुन्या, गंजलेल्या जलवाहिन्यांमुळे ४० टक्के पाणीगळती होते. त्यामुळे पाणी वाया जाण्याबरोबरच दूषित पाणीपुरवठा होऊ शकतो. पाश्‍चिमात्य देशांत प्लंबरला देशाच्या ‘आरोग्याचे रक्षक’ म्हणून संबोधले जाते. भारतात मात्र प्लंबर कुणाच्या खिजगणतीतही नसतात. त्यामुळे आयटीआयमध्ये ‘प्लंबर लॅब’ सुरू केली आहे. 
- मोहन पाटील, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख, बॉश कंपनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com