आता आयटीयन्सचा वाहतुकीचा जाहीरनामा

Itians
Itians

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि तळवडे सॉफ्टवेअर पार्कमधील वाहतूक समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मसुदा तयार करण्याचे काम सुरू झाले असून, येत्या दोन आठवड्यांत तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशेषतः हा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे. 

आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी हा कायमच चर्चेत असणारा विषय. मात्र, सरकारला त्याचे गांभीर्य नाही. आतापर्यंत या विषयावर केवळ चर्चा आणि बैठकाच झाल्या. त्यादृष्टीने ठोस पावले मात्र उचलली गेली नाही. तथापि, येथील वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागला आहे. त्यामुळे आयटीयन्स बेजार झाले आहेत. त्यावर तोडगा म्हणून त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे
हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकड येथील अंडरपासमध्ये दर पावसाळ्यात पाणी साठते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. एमआयडीसी किंवा स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन साठलेले पाणी काढले पाहिजे. मात्र, त्यांच्याकडून या प्रश्‍नाकडे डोळेझाक केली जाते.

आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता येथील रस्त्याचा विस्तार होणे आवश्‍यक आहे. गेल्या पाच वर्षांत विकसित केलेले रस्ते व अंडरपास पुरते फसले आहेत. शिवाजी चौकामध्ये चालण्यासाठी पदपथ नाहीत. शिवाजी चौक, भूमकर चौक परिसरातील रस्ते सुस्थितीत नाहीत. 

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. एकीकडे राज्य सरकार समृद्ध महामार्गासाठी भूसंपादन करू शकते. तर मग आयटी परिसरात चांगल्या रस्त्यांची सुविधा देऊ शकत नाही का?

आयटी पार्कमधील वाहतूक समस्येमुळे आयटीयन्स हैराण झाले आहेत. आतापर्यंत अनेकदा या प्रश्‍नावर ऊहापोह झाला आहे. आता त्यावर ठोस कृती करण्याची आवश्‍यकता आहे. सरकारचे लक्ष वेधून त्यावर मार्ग निघावा, हा या जाहीरनाम्यामागील हेतू आहे. आयटी कर्मचारी त्यासाठी आपली मते मांडू शकतात. 
- पवनजित माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com