सरकारला बाजूला करण्याची वेळ आली आहे : अजित पवार (व्हिडीओ)

Its time to put aside the center government and the state government says Ajit Pawar
Its time to put aside the center government and the state government says Ajit Pawar

बारामती शहर - पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीने लोक मेटाकुटीस आलेले आहेत, सर्वस्तरावर आलेले अपयश आता भाजप सेनेला झाकता येणार नाही. केंद्र व राज्यातील या सरकारला आता बाजूला करण्याची वेळ आली असून जनतेनेच आता याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, 'आज जगात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात व त्यातही महाराष्ट्रात आहे. अमेरिकेतही पंचेचाळीस रुपये लिटरने पेट्रोल मिळत असताना आपल्याकडे ते का शक्य नाही. युपीएचे सरकार असताना प्रति बॅरल जागतिक बाजारपेठेत आतापेक्षा जास्त दर होता, आता हाच दर निम्म्याहून खाली असला तरी आता पेट्रोल नव्वदीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. आमच्या काळातील चारशे रुपयांचा गॅस सिलिंडर आज आठशेपर्यंत गेला, ज्या वेगाने इंधन दरवाढ होत आहे ती पाहता पेट्रोल लवकरच शंभरी गाठेल. ज्या दराने पेट्रोल येते त्याहून करांचा बोजा अधिक करण्याचे काम या सरकारने केले, वास्तविक जगात असे कुठेच घडत नाही.'

इंधन जीएसटीच्या कक्षेत आणा -
आजपर्यंत चार वर्षात सरकारने अंदाजे बारा लाख कोटी रुपयांचा कर इंधनावरील करांच्या माध्यमातून वसूल केला आहे. जीएसटीच्या कक्षेत इंधन आले की त्याचा दर देशभरात एकसारखाच असेल व दर कमी होण्यातही त्याची मदतच होईल.

तर सरकारला झुकावेच लागेल... -
जर जनतेने आंदोलन उभारले तर सरकारला इंधन दरवाढ कमी करावीच लागेल, त्यांना जनमताच्या रेट्यापुढे झुकावेच लागेल, त्यामुळे इंधन दरवाढीच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

काँग्रेससोबत राष्ट्रवादीही बंदमध्ये सहभागी होणार -
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने दिलेल्या देशव्यापी बंदमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारला जागे करण्यासाठीच्या सोमवारच्या आंदोलनात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन केले. हा पक्षीय मुद्दा नाही हे जनतेचे आंदोलन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com