आययूएमएस प्रणालीसाठी स्वतंत्र समिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पुणे - महाविद्यालयातील प्रशासकीय कामाच्या व्यवस्थापनात, परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षांचे निकाल यांच्यात सुसूत्रता आणण्यासाठी सरकारने ‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टिम’ (आययूएमएस) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सरकारने आता स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांना ही प्रणाली लागू केली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासून ते प्रवेशप्रक्रिया, परीक्षा पद्धती, परीक्षेचा निकाल, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतची एकात्मिक प्रणाली म्हणून ‘आययूएमएस’कडे पाहिले जाते. एक खिडकी योजनेप्रमाणे ही प्रणाली असून, राज्यातील सर्व विद्यापीठांशी ती जोडलेली आहे. संबंधित अभ्यासक्रमांचे प्राध्यापक, विद्यापीठातील प्रशासकीय कामे, शैक्षणिक संस्थांची सविस्तर माहिती, विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी इतर माहिती या प्रणालीद्वारे सहज उपलब्ध होणार आहे.  प्रशासकीय कामकाज, विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, परीक्षा अशा विविध प्रकारच्या कामकाजात प्रणालीमुळे सुसूत्रता येणार आहे, असे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले.

Web Title: IUMS process independent committee