जाधव भगिनींचे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

प्रा. प्रशांत चवरे
सोमवार, 18 जून 2018

सलोनी संतोष जाधव व सानिका संतोष जाधव या भगिनींनी जिल्हास्तरीय कुराश (कुस्ती) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.

भिगवण - भादलवाडी (ता. इंदापुर) येथील विदया प्रतिष्ठानच्या बिल्ट इंग्लिश मेडियम स्कूलच्या सलोनी संतोष जाधव व सानिका संतोष जाधव या भगिनींनी जिल्हास्तरीय कुराश (कुस्ती) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. दोघी भगिनीनी मिळविलेल्या या य़शाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

जिल्हास्तरीय कुराश (कुस्ती) स्पर्धा नुकत्याच इंदापुर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भादलवाडी (ता. इंदापुर) येथील बिल्ट इंग्लिश मेडियम स्कुलची विदयार्थिनी सलोनी संतोष जाधव या इयत्ता ८ वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने १४ वर्षे वयोगटाखालील व ५० किलो वजन गटामध्ये सहभाग घेतला होता. सलोनीने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकविले. त्याचबरोबर याच शाळेतील सानिका संतोष जाधव या शाळेमध्ये इयत्ता ३ री मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने ९ वर्षे वयोगटाखालील २८ किलो वजन गटामध्ये सहभाग घेतला होता. सानिकाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकविले. दोघींची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलोनी व सानिका यांना दत्तात्रय व्यवहारे, जयश्री व्यवहारे, अजिनाथ बळगानोरे, सुनिल जाधव, सागर बनसुडे, ज्ञानेश्वर भोई, अनिल जाधव, तेजश्री व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या सरिता शिंदे, क्रिडा शिक्षक नवनाथ इंगळे, जिल्हा कुराश असोसिएशनचे सचिव दत्तात्रय व्यवहारे यांनी अभिनंदन केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Jadhav sisters got gold medal in District Level Wrestling Championships