#Wrestling जाधव भगिणींना राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक 

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 1 जुलै 2018

भिगवण : भादलवाडी(ता.इंदापुर) येथील येथील विदया प्रतिष्ठानच्या बिल्ट इंग्लिश मेडियम स्कुलच्या विदयार्थिनी सलोनी संतोष जाधव व सानिका संतोष जाधव या भगिणींनी राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. ग्रामीण भागामधील मुलींनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशन व पुणे जिल्हा कुराश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा पुणे येथील एसएल फिटनेस क्लब येथे राज्यस्तरीय कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भादलवाडी (ता.इंदापुर) येथील बिल्ट इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली विदयार्थिनी सलोनी संतोष जाधव हिने १४ वर्षे वयोगटाखालील खुल्या वजन गटामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये सलोनीने रौप्य पदक पटकविले. त्याच बरोबर याच विदयालयातील सानिका संतोष जाधव या इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने ९ वर्षे वयोगटाखालील २७ किलो वजन गटामध्ये सहभाग घेतला होता. सानिकानेही या स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकाची कमाई केली.

सलोनी व सानिका यांना दत्तात्रय व्यवहारे, जयश्री व्यवहारे, अजिनाथ बळगानोरे, सुनिल जाधव, सागर बनसुडे, ज्ञानेश्वर भोई, अनिल जाधव, तेजश्री व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या सरिता शिंदे, क्रिडा शिक्षक नवनाथ इंगळे, जिल्हा कुराश असोसिएशनचे सचिव दत्तात्रय व्यवहारे यांनी अभिनंदन केले आहे.
 
Web Title: Jadhav sisters win silver medal in state level wrestling championship