जाधववाडी-मोशी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

जाधववाडी, चिखली - चिखली-मोशी शिवेवरील रस्त्याचे अंतिम टप्प्यात आलेले काम.
जाधववाडी, चिखली - चिखली-मोशी शिवेवरील रस्त्याचे अंतिम टप्प्यात आलेले काम.

चिखली - जाधववाडी मोशी सीमेवर बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर भोसरी-निगडी हा स्पाइन रस्ता आणि चिखली मोशी येथून जाणारा देहू-आळंदी रस्ता जोडला जाणार आहे. विशेषतः या परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंचवीस कोटी रुपये खर्चून हा चिखली मोशी शिवेवर रस्ता विकसित करण्यात येत आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत तो पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. 

२४ मीटर रुंदीचा हा रस्ता पेठ क्र. १३ ते जाधववाडीमार्गे (चिखली) देहू-आळंदी रस्त्याला जोडतो. तसेच, मोशी उपबाजार समिती, नाशिक रोड, भोसरी, पिंपरी-चिंचवड आदी परिसरात जाण्यासाठी हा रस्ता उपयोगाचा ठरणार आहे. सध्या हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. शेकडो सोसायट्या विकसित होत आहेत. येथील वीस ते पंचवीस हजार रहिवाशांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे.

चिखली-मोशी परिसराचा झपाट्याने विकास होत असताना लोकसंख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यादृष्टीने नव्याने समाविष्ट गावातही लोकप्रतिनिधींनी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बीआरटी रस्ता वगळता जाधववाडी मोशी शिवेवरचा समाविष्ट गावातील २४  मीटर रुंदीचा हा पहिला रस्ता आहे. या भागात विकसित झालेल्या सोसायट्यांसाठी हा रस्ता उपयोगाचा ठरणार आहे. 
- राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com