जगन्नाथ रथयात्रेद्वारे भगवद्‌गीतेचा प्रसार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - हरे राम... हरे कृष्णा, कृष्ण मुरारी हरे हरे... हरिओम... भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलदेवजींचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या ठेक्‍यावर तल्लीन होत, भक्तिमय वातावरणात काढलेल्या रथयात्रेत "इस्कॉन'च्या हजारो अनुयायांनी भगवद्‌गीतेचा प्रसार व प्रचार केला. तसेच, विश्‍वात शांतता नांदावी, चारित्र्यसंपन्न तरुणपिढी घडावी म्हणून प्रार्थनाही केली. 

कात्रज येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाने (इस्कॉन) श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सवानिमित्त रविवारी रथयात्रा काढली. यात सुमारे पाच हजार स्त्री-पुरुष भाविक सहभागी झाले होते. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, बाजीराव रस्त्यावरून लक्ष्मी रस्ता, उंबऱ्या गणपती चौक, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून जंगली महाराज रस्ता येथून लकडी पुलावरून टिळक चौक मार्गे पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलपर्यंत रथयात्रेचा मार्ग होता. आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथावर भगवान जगन्नाथ, सुभद्रा, बलदेवजींच्या प्रतिमा विराजमान झाल्या होत्या. इस्कॉनचे अनुयायी नागरिकांना प्रसादाचे वाटप करीत होते. यात्रा मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात येत होत्या. तसेच, रथावर फुलांची उधळण होत होती. सामाजिक संस्थांतर्फे रथयात्रेचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात येत होते. इस्कॉनचे अनुयायी आनंद मुरारीदास म्हणाले,""दरवर्षी जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येते. भक्तिभावाने भगवान राम, कृष्णाचा जयघोष करीत हजारो साधक यात सहभागी होतात.'' 

Web Title: Jagannath Rath Yatra

टॅग्स