जगन्नाथांच्या रथयात्रेमध्ये  ‘हरे राम, हरे कृष्ण’चा जयघोष

जगन्नाथांच्या रथयात्रेमध्ये  ‘हरे राम, हरे कृष्ण’चा जयघोष

पुणे - ‘हरे राम, हरे कृष्ण’चा गजर करत पुण्यातील रस्त्यांवरून श्री श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव, महादेव शंकर, प्रभू श्रीराम, नरसिंह आदी देवांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरत होती. या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. इस्कॉन हरे कृष्ण संस्थेच्यावतीने रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, रथयात्रेचे हे पाचवे वर्ष आहे.

टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळापासून निघालेली यात्रा टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, नारायणपेठ मार्ग ओंकारेश्‍वर मंदिराजवळून जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक (अलका टॉकीज) चौकातून पुन्हा टिळक रस्ता मार्गे सर परशुराम महाविद्यालयात आली. ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरीमध्ये असलेल्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची रथयात्रा जगातील १७० देशांमध्ये काढली जाते. त्याचेच एक प्रतीक म्हणून पुण्यातही ती काढण्यात आली. या यात्रेची सांगता सायंकाळी साडेसहाला झाली.

भगवान श्रीकृष्ण द्वारकेत राहतात, तर त्यांचे भक्त त्यांना परत वृंदावनमध्ये घेऊन जातात. याचे प्रतीक म्हणून दरवर्षी जगन्नाथ पुरीमध्ये रथयात्रा साजरी केली जाते. या यात्रेला जगभरात प्रसिद्ध करण्याचे काम इस्कॉनचे संस्थापक आचार्य स्वामी शील प्रभू पाध्ये यांनी केले. 
- रासपती दास, सदस्य, इस्कॉन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com