जगताप आत्महत्येप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत 11 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जितेंद्र जगताप यांच्या कार्यालयातून मृत्यूपूर्व लिहिलेली आणखी एक चिठ्ठी पोलिसांना प्राप्त झाली आहे. 

याप्रकरणी जयेश जितेंद्र जगताप (वय 28, रा. घोरपडे पेठ) यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती. जगताप यांनी शनिवारी घोरपडीतील लोहमार्गावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. जगताप यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी विनोद रमेश भोळे (वय 34, रा. घोरपडी पेठ, जोशीवाडा), सुधीर दत्तात्रय सुतार (वय 30, रा. जयभवानीनगर, कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय 28, मांडवी खुर्द, ता. हवेली), अतुल शांताराम पवार (वय 36, रा. शांतीनगर, येरवडा) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय 30, रा. येरवडा) यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, गुरुवारी कोठडी संपत होती. त्यानंतर तपासासाठी पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. 

Web Title: Jagtap suicides have increased in the custody of the accused