...तर जगण्याची लढाई सुटेल अर्ध्यावरच !

औंध रस्ता परिसरातील वसाहतीत राहणारे जगताप हे फळ विक्री करून उदरनिर्वाह भागवितात.
selling fruits.
selling fruits.esakal

औंध रस्ता परिसरातील वसाहतीत राहणारे जगताप हे फळ विक्री करून उदरनिर्वाह भागवितात. ते कुटुंबापासून विलग राहतात. काही वर्षांपूर्वी अपघात झाल्याने त्यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पायाची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना कष्टाची कामे करणे अशक्‍य झाले. त्यामुळे त्यांनी हातगाडीवर फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, कोरोनामुळे त्यांची जीवन जगण्याची लढाई अवघड झाली आहे.

खडकी रेल्वे स्टेशन परिसरात फळे विक्री करून जगताप यांना पोटाला दोन घास मिळायचे. पण मार्च २०२० लॉकडाउन लागले अन् त्याच्या व्यवसायावर मर्यादा आल्या. एरवी दररोज त्यांना २०० ते २५० रुपये मिळायचे; पण लॉकडाउननंतर ५० रुपयेही मिळणे अवघड झाले. आता ५० रुपयांत दोन वेळेचे जेवण, नाश्‍ता कसा मिळणार? हा प्रश्‍न जगताप यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यानंतर त्यांनी काही दिवस अर्धपोटी राहून दिवस काढले.

परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद छाजेड यांच्याकडून करण्यात येणाऱ्या अन्नदानातून त्यांच्या पोटाला या काळात चार घास मिळाले. आतापर्यंत स्वतःच्या कष्टावर जगणाऱ्या जगताप यांना कोरोनामुळे दुसऱ्यांकडून मिळणाऱ्या अन्नावर जगण्याची वेळ आली. पर्याय नसल्याने त्यांनी खिचडीवर कसेबसे दिवस काढले.

पहिला लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा त्यांनी फळ विक्रीचा व्यवसाय सुरु करून उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू केली. त्यातच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. त्यानंतर मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील लॉकडाउन जगताप यांच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्यांच्या जिवावर उठला.

selling fruits.
पुणे ‘ग्लोबल मेयर्स’च्या अंतिम फेरीत; जगातील 631 महापौरांमधून निवड

जगताप सध्या दररोज सकाळी केळी, आंबे विक्रीची हातगाडी लावतात. एक-दोन ग्राहकांनी केळी खरेदी केल्यावर २५ ते ५० रुपये मिळतात. खानावळीमध्ये जेवणाच्या ताटाची किंमत ७० रुपये आहे. साहेब, हाता-तोंडाचे गणित या पैशात कसे बसवायचे? किती दिवस उपाशी किंवा अर्धपोटी राहायचे? भविष्यासाठी बचतीचा विषय लांब राहिला, इथे पोटाला अन्नच मिळणार नसेल, तर जगण्याची लढाई कधी संपेल सांगता येत नाही, असे जगताप सांगत होते.

मी आता वृद्ध झालोय, अधू पायामुळे कुठले काम करू शकत नाही. केळी विक्री करून जगत होतो. पण दीड वर्षापासून कोरोनाचा फटका सहन करीत आहे. किती दिवस असे चालणार. कामही करून जगता येणार नसेल, तर मग जगायचे तरी कसे ?

- शशिकांत जगताप, फळे विक्रेता.

selling fruits.
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदतवाढ

कोरोनामुळे पथारी व्यावसायिकांना जीवन जगणे अवघड झाले आहे. तरीही महापालिकेकडून त्यांच्याकडून दंडासहित भाडेवसुली केली जात आहे. ही वसुली त्वरित थांबविण्यात यावी.

-बाळासाहेब मोरे, राज्य सरचिटणीस, पथारी व्यावसायिक पंचायत.

- २०१६ पूर्वीचे पथारी व्यावसायिक : ७ हजार ५००

- सध्याची एकूण संख्या : ४८ हजार ५००

- परवाना मिळालेले : २२ हजार

- परवाना न मिळालेले : २६ हजार ५००

- कोरोनाचे अनुदान मिळालेले : ८ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com