जयसिंग भानगिरे यांचे अकस्मात निधन

sameer-tamboli.
sameer-tamboli.

हडपसर - महंमदवाडी - हडपसर शिवसेना माजी विभाग अध्यक्ष, पुणे शहर समनव्ययक महंमदवाडी-हडपसर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, युवानेते जयसिंगअण्णा भानगिरे यांचे  ह्रदयविकाराच्या झटक्याने आज (शनिवार) पहाटे निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते.

त्यांच्या जाण्याने महंमदवाडी वासीयांसह भानगिरे परिवाराला मोठा धक्का बसला असून सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वच स्तरांमध्ये जयसिंगअण्णा 
भानगिरे यांचा मोठा चाहता वर्ग होता. शिवसेनेचे ते हडपसर मतदार संघात पहिल्या फळीतील युवानेते होते.

नगरसेवक प्रमोद भानगिरे यांचे ते थोरले चुलतबंधू होते, त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, बंधू असा मोठा परिवार आहे.

आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली होती. महंमदवाडी-काळेपडल परिसरात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. विविध संस्था, मंडळे यांना सढळ हाताने मदत करणारा, गरजूंच्या पाठीशी सदैव उभा राहणारा शिवसेनेचा दिलदार युवानेता काळाच्या पडद्याआड गेल्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिवसैनिक यांनी महंमदवाडी येथे धाव घेतली आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी 4 वाजता महंमदवाडी येथे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com