भिगवणच्या उपसरपंचपदी जयदीप जाधव बिनविरोध निवड

प्रशांत चवरे
गुरुवार, 31 मे 2018

भिगवण : भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयदीप शंकरराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारीत वेळेत जयदीप जाधव यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.

भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. सरपंच हेमाताई माडगे यांचे अध्यक्षेखाली उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारीत वेळेत जयदिप जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी भिमराव भागवत यांनी श्री. जाधव यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

सरपंच हेमाताई माडगे, माजी सरपंच प्रशांत शेलार, पराग जाधव, माजी उपसरपंच शंकरराव गायकवाड,प्रदीप वाकसे, संतोष धवडे, अण्णासाहेब धवडे, रामहारी चोपडे, अजिंक्य माडगे, जावेद शेख व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने श्री. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांना विश्वासात घेऊन लोकाभिमुख कारभार करु अशी ग्वाही निवडीनंतर बोलताना उपसरपंच जयदीप जाधव यांनी दिली.  
 
Web Title: jaideep jadhav i sub-district of Bhilvagan