बॅ. जयकर यांच्या आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचा वाटा असलेले आणि विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मु. रा. जयकर यांच्या आठवणींना त्यांच्या नातवंडांनी उजाळा दिला. जयकर यांच्या लंडनमधील नातवंडांनी सोमवारी विद्यापीठाला सोमवारी सदिच्छा भेट दिली. 

जयकर यांची आता सत्तरीत असलेली नातवंडे रोझालिंड हार्वे, मिचेल जयकर आणि पणतू अलेक्‍स हार्वे हे विद्यापीठात आले होते. त्यांच्यासमवेत पुणे, मुंबई, नागपूर येथील इतर नातेवाईकदेखील होते. रोझालिंड आणि मिचेल हे पहिल्यांदाच विद्यापीठात आले होते. आपल्या आजोबांनी उभे केलेले विद्यापीठ पाहण्याची तीव्र इच्छा त्यांना होती. विद्यापीठाची मुख्य इमारत, त्यातील विविध दालने, मध्यवर्ती संग्रहालय, जयकर ग्रंथालय या वास्तूंना त्यांनी भेटी दिल्या. ग्रंथालयातील जयकर यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांची छायाचित्रे त्यांनी पाहिली. विद्यापीठाचा ऐतिहासिक वारसा पाहत त्यांच्या कुटुंबीयांनी आठवणींना उजाळा दिला.

‘‘विद्यापीठात येऊन भारावून गेलो. आजोबांशी असणारा ऋणानुबंध विद्यापीठात आल्याने अधिक घट्ट झाला.’’ अशी भावना रोझालिंड यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे बाहेरगावी असल्याने जयकर कुटुंबीयांचे स्वागत प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, डॉ. अंजली क्षीरसागर उपस्थित होते.

Web Title: Jaikar Family University