सासवडला शेतकरी प्रश्नी जेल भरो आंदोलन

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 15 मे 2018

सासवड (पुणे) : महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सासवड - जेजुरी मार्गालगत कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून शेतकऱयांच्या विविध प्रश्नी घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलीसांना लेखी निवेदन देऊन पोलीसांनी जेल भरोच्या या आंदोलकांना ताब्यात घेतले.

सासवड (पुणे) : महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सासवड - जेजुरी मार्गालगत कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून शेतकऱयांच्या विविध प्रश्नी घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलीसांना लेखी निवेदन देऊन पोलीसांनी जेल भरोच्या या आंदोलकांना ताब्यात घेतले.

सासवड एसटी बसस्थानकासमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यालयागत आज (ता.15) दुपारी शेतकरी व कार्यकर्ते जमले. तेथून घोषणा देत सारेजण पालिका चौक, जयप्रकाश चौकमार्गे सासवड - जेजुरी महामार्गावर आले. तिथे काही वेळ घोषणा दिल्यानंतर व पोलीसांनी बंदोबस्तावरील ताण लक्षात घेता रास्ता रोको न करण्याचे आवाहन केले. त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व सुकाणू समितीचे सदस्य गणेश (काका) जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात आले. तिथे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी शेतकरी मागणीचे निवेदन स्विकारले. तसेच जेल भरोच्या या आंदोलकांना पोलीसांनी दुपारी साडेबारा वाजता ताब्यात घेतले. दुपारी दिड तासानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संजयनाना जगताप, अकुश देशमुख, राधा जगताप, छगन मिसाळ, महादेव खेंगरे, जालींदर शेलार, पद्मा जगताप, उषा खेडेकर, सविता यादव, रेखा भांडवलकर आदी सहभागी होते. सुकाणू समितीचे सदस्य जगताप म्हणाले, "सरसकट कर्जमाफी, फवारणीतील विषबाधीत शेतकऱयांचा प्रश्न, गारपीटग्रस्तांकडे दुर्लक्ष, नोटाबंदीग्रस्त, भूसंपादन ग्रस्त, गोहत्त्याबंदीने त्रस्त शेतकरी, वनहक्क कायद्याची रखडलेली अंमलबजावणी आदी प्रश्न आहेत.

मात्र शेतकऱयांच्या प्रश्नांची सरकार टिंगल करते आहे. तसेच शेतीमालास हमीभाव नाही, सरकारी माल खरेदीत किंमतीत तफावत, खरेदी धिम्या गतीने. त्यामुळे शेतकऱयांचा मोदी व फडणवीस सरकारकडून पुरता भ्रमनिरास झाला आहे. शेतकरी आत्महत्त्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांच्या जगण्याच्या अधिकारासाठी हे जेलभरो आंदोलन केले आहे." 

पुरंदला विमानतळ नको, गुंजवणीचे पाणी द्या
पुरंदला नियोजित विमानतळ नको, तर गुंजवणी धरणाचे पाणी द्या. जमिनी घेऊ नका, जमिनीला पाणी द्या. , अशी मागणी करत जगताप म्हणाले , पुरंदर उपसा सिंचन योजनेत शेतकऱयांचे पाणी घेण्याच्या 24 तासांपैकी 16 तासांचे बिल सरकार भरते आहे. मग 16 तासही योजना चालत नाही. त्यामुळे शेतकऱयांचे हिस्स्याचे पैसे घेण्याचा प्रश्नच येत नाही. 

Web Title: jail bharo movement for farmer issue saswada