जैन साध्वी डॉ. चंदनाजी यांचा चिंचवडला मिरवणुकीद्वारे प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पिंपरी - जैन साध्वी डॉ. चंदनाजी आणि डॉ. अक्षयज्योतीजी यांचा चातुर्मासानिमित्त चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये मिरवणुकीद्वारे प्रवेश झाला. मिरवणूकीत जैन बांधव पारंपरिक पेहरावात सहभागी झाले होते. 

पिंपरी - जैन साध्वी डॉ. चंदनाजी आणि डॉ. अक्षयज्योतीजी यांचा चातुर्मासानिमित्त चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये मिरवणुकीद्वारे प्रवेश झाला. मिरवणूकीत जैन बांधव पारंपरिक पेहरावात सहभागी झाले होते. 

श्रीधरनगर येथून मिरवणुकीला सुरवात झाली. पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता, जैन स्थानक, गांधी पेठ या मार्गाने ही मिरवणूक कल्याण प्रतिष्ठान येथे आली. प्रतिष्ठानमध्ये मिरवणूक आल्यानंतर चिंचवडगाव जैन श्रावक संघाचे संघपती माणिकचंद लुणावत, अध्यक्ष दिलीप नहार, कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश सेठिया, राजेंद्र जैन, पारस मोदी यांच्या हस्ते ध्वज वंदन झाले. त्यानंतर, प्रतिष्ठानमधील श्री जय गुरू गणेश सभा मंडपमचे उदघाटन करण्यात आले. 

नवकार आराधिका प्रतिभाकवरजी, साध्वी मंजुळाज्योतीजी तसेच महापौर नितीन काळजे, जैन कॉन्फरन्सचे अविनाश चोरडिया, विजयकांत कोठारी, पारस मोदी, उद्योजक राजेश सांकला, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते. पनवेल आणि मेवाड श्री संघाचे (पुणे) पदाधिकारी खास प्रवेश कार्यक्रमानिमित्त आले होते. साध्वी डॉ. चन्दनाजी यांचे प्रवचन झाले. साध्वी अक्षदाश्रीजी, शारदा नहार यांनी स्तवन सादर केले. काळजे यांनी चातुर्मासानिमित्त जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. जैन कॉन्फरन्स पंचम झोनतर्फे उपस्थितांना मुहपत्तीचे (तोंडाला बांधण्याचे वस्त्र) वितरण करण्यात आले. मनोज बाफना यांनी साध्वी वृंदाचा परिचय करून दिला. संतोष धोका यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार लुणावत यांनी आभार मानले. अशोक मंडलेचा, अशोक बागमार, हेमंत गुगळे, सचिन धोका, उमेश भंडारी, मयूर शिंगवी यांनी संयोजन केले. 

Web Title: Jain Sadhvi Dr. Chandniji's entry into Chinchwad