दोषींना वाचविण्यासाठी खटाटोप?

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - जलपर्णीच्या निविदांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची महापौर आणि महापालिका आयुक्तांची घोषणा चौकशी समितीनेच उडवून लावली आहे. या प्रकरणातील पदाधिकारी- अधिकाऱ्यांचे उद्योग लपविण्यासाठी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा अहवाल देण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मात्र, या प्रकरणाचा ठपका सत्ताधारी भाजपवर ठेवत पालिकेतील विरोधी पक्षांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

तलावांत जलपर्णी नसताना आठपट जादा दराची निविदा काढल्याचे ‘सकाळ’च्या वृत्तानंतर उघड झाले. आयुक्त राव यांच्या आदेशानुसार सात दिवसांत म्हणजे बुधवारी (ता. २०) अहवाल मिळणे अपेक्षित होते. ही मुदत संपून आता पाच दिवस होत आले, तरी कोणीही अहवालाचे नावही काढत नसल्याचे स्पष्ट आहे. 

आज पुन्हा आंदोलन
जलपर्णीच्या निविदेबाबतचा अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढत चालले आहे. या बनावट निविदांमागील खऱ्या सूत्रधारांना पाठीशी घालण्याच्या उद्देशाने चौकशी होत नसल्याचेही एका अधिकाऱ्यानेच सांगितले. दररम्यान, हे प्रकरण भाजप नेत्यांचेच असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अहवालाच्या मागणीकडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदार वंदना चव्हाण आणि चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com