मावळातील जलयुक्त शिवारला रोटरीचा हातभार

गणेश बोरुडे
शनिवार, 14 एप्रिल 2018

तळेगाव स्टेशन (पुणे) : शासनाने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मावळ तालुक्यात चालू असलेल्या जलसंधारणच्या कामांना रोटरी क्लबने हातभार लावला असून, ८ गावतळ्यांचे गाळ काढणी काम हाती घेतले आहे.

तळेगाव स्टेशन (पुणे) : शासनाने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मावळ तालुक्यात चालू असलेल्या जलसंधारणच्या कामांना रोटरी क्लबने हातभार लावला असून, ८ गावतळ्यांचे गाळ काढणी काम हाती घेतले आहे.

जलसंधारणाच्या कामात तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावावा असे आवाहान मावळचे तहसीलदार  रणजीत देसाई यांनी केल्यानंतर आवाहनाला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद देत, “रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी” यांनी ८ गावातील शेत तळ्यातील गाळ काढून देण्याचे काम सुरु केले आहे.या युद्धपातळीवर सुरु असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार देसाई, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभयजी गाडगीळ यांनी शुक्रवारी मौजे कल्हाट येथे नुकतीच भेट दिली.

रोटरी सिटीने हाती घेतलेल्या या प्रकल्पाला मावळ तालुका खाण उद्योजक संघटना यांची मोलाची साथ मिळाली आहे.काळाची गरज ओळखून अशा प्रकारचे लोकपयोगी काम करण्यासाठी रोटरी सारखी संस्था शासनाच्या मदतीला धावून आल्याबद्दल भागडे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पुढील काळात अशा कामांसाठी शासन आपल्या पाठीशी सदैव उभे असेल याची ग्वाही दिली.आवाहानाला सर्व प्रथम प्रतिसाद दिल्या बद्दल तहसीलदार देसाई यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे आभार मानले. रोटरी सिटी समाजासाठी नेहेमीच छोटे-मोठे उपक्रम घेत असते. पण काळाची गरज ओळखून असा जलसंधारणाचा मोठा उपक्रम दुर्गम भागात रोटरी सिटीने हाती घेतल्याबद्दल गाडगीळ यांनी प्रभावित झाल्याचे सांगितले.

मावळ तालुका खाण उद्योजक संघटनेच्या सहकार्याने सुरु केले काम, पावसाळ्यानंतर या भागाचे रुपडेच बदलून टाकणारे असेल असा विश्वास रोटरी सिटीचे अध्यक्ष शशिकांत हळदे यांनी व्यक्त केला.गावाचे उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष या उपक्रमाने निश्चित दूर होईल अशी भावना या प्रसंगी सरपंच सुनिता पवार यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला मावळ तालुका खाण उद्योजक संघटनेचे अध्यक्ष विलासजी काळोखे ,तालुका कृषी अधिकारी विनायक कोथमिरे , नंदकुमारजी शेलार ,रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर कौस्तुभ दामले,रोटरीचे फाउंडेशन डायरेक्टर पंकज शहा उपस्थित होते.तसेच मावळ तालुका खाण संघटनेचे उपाध्यक्ष श्री सागर पवार, सचिव श्रीकांत वायकर, किरण काकडे, संदीप काळोखे, कल्हाटच्या सरपंच सुनिता पवार, आंबळेचे सरपंच मोहन घोलप, पोलीस पाटील, सारिका थरकुडे, रवी पवार, बबन आगिवले, दिगंबर आगिवले, रोहिदास धनवे, भाऊ कल्हाटकर, विनायक कल्हाटकर, संतोष पवार, मनोज करवंदे, जावेद मुलांनी व रोटरी सिटी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: jalyukta shivar helped by rotary