पुण्यातील रंगकर्मींनी ग्रिप्समध्ये जिंकली मने

Jamba-Bamba-Bu
Jamba-Bamba-Bu

पुणे - ग्रिप्स नाट्य चळवळीच्या सुवर्ण महोत्सवात बर्लिनमध्ये पुण्यातील कलाकारांनी रसिकांची दाद मिळविली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘जंबा बंबा बू!’ नाटकातून जंगलातून शहरात येणाऱ्या मुलाचे भावविश्‍व कलाकारांनी उभे केले. 

ग्रिप्स नाट्य चळवळीचा सुवर्णमहोत्सव बर्लिनमध्ये साजरा झाला. या महोत्सवात पुण्यातून काही कलाकार सहभागी झाले होते. त्यासोबतच वेगवेगळ्या २८ देशांतील रंगकर्मींनी सहभाग घेतला. ‘जंबा बंबा बू!’ हे नाटक ‘जंगलबुक’ कादंबरीवर आधारित आहे. जंगलात वाढलेला मुलगा ‘मोगली’ शहरात येतो, तेव्हा त्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. जात-पात, धर्म, अशा गोष्टींना त्याला कसे सामोरे जावे लागते, यावर आधारित हे नाटक आहे. श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे यांनी हे नाटक लिहिले आहे. राधिका इंगळे यांनी दिग्दर्शित केले आहे.

ग्रिप्स चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करताना अतिशय आनंद झाला. यामध्ये अनेक देशांतून नाटके सादर केली गेली. यापूर्वी ‘दू ॲण्ड मी’ हे नाटक बर्लिन येथे ग्रिप्समध्ये सादर केले होते; परंतु सुवर्ण महोत्सवात सादर करतानाचे महत्त्व वेगळेच होते. 
- श्रीरंग गोडबोले, नाटककार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com