तासाभरात 30 दुचाकींना जॅमर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे - शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौकात वाहतूक पोलिसांनी वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या 30 चालकांच्या दुचाकींना जॅमर लावून कारवाई केली. तासाभरात झालेल्या कारवाईत 32 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, शहराच्या विविध भागांत 66 ठिकाणी "नो ट्रॅफिक रूल व्हायलेशन झोन' तयार करून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

सिमला ऑफिस चौकात बुधवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पोलिसांनी कारवाई सुरू केली. वाहन चालविण्याचा परवाना नसलेले 30 दुचाकीस्वार त्यात सापडले. त्यात वाहनचालकाला 500 रुपये आणि ते ज्याचे आहे, त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला. या चौकातून वाहन चालविण्याचा परवाना नसलेला तरीही ट्रिपल सिट जात असलेल्या एका वाहनचालकावरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. 

याबाबत वाहतूक शाखेतील सहायक आयुक्त प्रभाकर ढमाले म्हणाले, ""वाहनचालकांमध्ये प्रबोधन निर्माण करण्याच्या उद्देशाने अशी कारवाई केली आहे. वाहन चालविताना परवाना जवळ बाळगणे आवश्‍यक आहे.'' दरम्यान, शहराच्या वेगवेगळ्या भागांतील 66 रस्त्यांवर "नो व्हायलेशन झोन' तयार करून तेथे ठराविक वेळी वाहतूक शाखेची कारवाई होणार आहे. त्यासाठी विशेष मनुष्यबळही तैनात करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

दुहेरी कारवाईची शक्‍यता 
बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पासपोर्ट कार्यालय आणि पोलिसांच्या चारित्र्य पडताळणी विभागालाही पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर दुहेरी कारवाई होऊ शकते.

Web Title: Jamer to 30 bikes per hour