CoronaVirus : पुण्यातील सिंहगड पायथा परिसर पडला ओस: जनता कर्फ्यूला प्रतिसाद

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 22 मार्च 2020

गडावर चालण्यासाठी,  व्यायामासाठी हजारो जण येतात. त्यांची सुरवात पहाटे साडेतीन वाजल्यापासून सुरवात होत असते. ते सर्वजण सिंहगड पायथा येथे वाहने उभी करून गडावर पायी जातात दीड दोन तासांच्या पायपीटीनंतर हे परत जातात.

खडकवासला(पुणे) : दर रविवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे सिंहगड पायथा म्हणजे आतकरवाडीचा परिसर गजबजलेला असतो. जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवरआज मात्र, या परिसरात पूर्णपणे शुकशुकाट होता. 

Image|

गडावर चालण्यासाठी,  व्यायामासाठी हजारो जण येतात. त्यांची सुरवात पहाटे साडेतीन वाजल्यापासून सुरवात होत असते. ते सर्वजण सिंहगड पायथा येथे वाहने उभी करून गडावर पायी जातात दीड दोन तासांच्या पायपीटीनंतर हे परत जातात. अशा नागरिकांमुळे आतकरवाडीला लवकर जाग येत असते. या नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे येथील भात खाचरे, शाळा हॉटेल, घराचे आंगण, वाडीत जाणारा, गडावर जाणारा रस्ता पार्कींग मुले पूर्ण भरलेला असतो. दर रविवारी येणारी सिंहगड पायथा विशेष बसेस देखील येत असतात. यातून हजारो पर्यटक नागरिक व्यायामासाठी येत असतात
Image
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिंहगड पायथा परिसर हे पार्कींग मात्र रिकामे होते. त्याला कारण ही तसेच होते. जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर येथील हॉटेल, पार्किंग रिकामी ओस पडली होती. 
Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janta Curfew gets support in at Sinhagad fort area in pune