एक जानेवारी रोजी पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

वाघोली - पेरणे फाटा (हवेली) येथील विजयरणस्तंभ अभिवादनासाठी येणारी गर्दी लक्षात घेता एक जानेवारी रोजी पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

एक जानेवारीला पहाटे 12 वाजून 10 मिनीटापासून पुढे 24 तास हा बदल राहणार आहे. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे. नगर कडून पुणेकड़े येणारी जड वाहने  शिक्रापूर येथून चाकण कडे, नगरकडून हडपसर, पुणेकडे येणारी वाहने शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा- केडगांव चौफुला सोलापूर हायवेमार्गे हडपसर पुणेकडे तर पुणेकडून नगरकडे जाणारी जड वाहने चाकणमार्गे किंवा खराडी बायपास येथून हडपसर-सोलापूर हायवे-केडगांव चौफुला मार्ग, नगरकडे वळविण्यात येणार आहेत. 

अभिवादनासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येतात. विजयरणस्तंभ हा पुणे नगर महामार्गलगत असल्याने वाहतुकीमुळे कोणतीही अडचण होऊ नये यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

Web Title: On January 1, the traffic on Pune city highway changed