'सरकारी पत्रकार नाहीत? त्याची बदलीच करतो!'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पुणे : "माझ्या कार्यक्रमाला सरकारी पत्रकार नाहीत? दिल्लीला फोन लावा...सरकारचं पुण्यातलं प्रसिद्धीचं ऑफिसच बंद करून टाकतो... पुण्यात अधिकारी कोण आहे, त्याची बदलीच करतो !'' अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी संताप व्यक्त केला.

मंत्री महोदय, असे अचानक रागवल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले पत्रकार अचंबित झाले. विद्यापीठातून पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना "कॅशलेस' अभियानात सहभागी होण्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आवाहन केले. हा कार्यक्रम रंगला. त्याच आनंदात ते तेथून बाहेर आले.

पत्रकार कुठे आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. तेथे उपस्थित तीन पत्रकार पुढे आले. त्यांनी सरकारी पत्रकार म्हणजेच "प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो'चे पत्रकार कुठे आहेत, असे विचारले.

देशातील मीडियाला मंत्री महोदयांचे भाषण पाठविणारे सरकारी पत्रकार नसल्याने त्यांचा पारा चढला. त्यांनी आपल्या स्वीय सहायकाला बोलावून फैलावर घेतले. ""तुम्ही "पीआयबी'ला सांगितले नाही का, त्यांचे प्रतिनिधी इथे का नाहीत? पीआयबीच्या अधिकाऱ्यांना लगेच फोन लावा. त्यांची नावे मला समजली पाहिजेत. त्यांची बदली करून टाकतो,'' अशा शब्दांत त्यांनी सहायकाला सुनावले.

सहायकाने कुणाला तरी फोन लावला. मंत्री त्यांच्याशी हिंदीत बोलले. "दोपहर चार बजे तक मुझे उनके नाम चाहिए. मै उनका तबादला कर देता हूं,'' असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. नंतर इतरांशी बोलणेही त्यांनी टाळले. पुढे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाला ते उपस्थित राहिले. तो संपल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी, "आमच्याशी बोला', अशी विनंती केली. मात्र, तेथेही ""नो बाइट. समारंभात मी केलेले भाषण चालवायचे, तर चालवा,'' असे म्हणत ते निघून गेले.

Web Title: javadekar threatens to transfer govt journalists