पुणे : जवान प्रसाद बेंद्रे यांना अखेरची मानवंदना

Prasad Bendre
Prasad Bendre

पुणे : सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय 27) यांचे मणिपूरमध्ये हृदयविकाराने निधन झाल्यानंतर रविवारी त्यांना सश्रुनयनांनी अखेरची मानवंदना देण्यात आली. 

बेंद्रे हे मूळचे पुण्यातील असून शिवाजीनगर गावठाणात पंचमुखी मारुती मंदिराजवळ त्यांचे घर आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी ते 'बीएसएफ'मध्ये रुजू झाले होते. काही काळ जम्मू काश्‍मीरमध्येही त्यांची नियुक्ती होती. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांच्यामागे आई, चार बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे. प्रसाद यांची नियुक्ती सध्या भारत- चीन सीमेवर होती. 

मणिपूरमधील इंफाळमध्ये त्यांचा "बेस' होता. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याबाबत शनिवारी नातेवाइकांना कळविण्यात आले. बेंद्रे यांचे पार्थिव दिल्लीहून रविवारी पहाटे पुण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मानवंदना देत असताना आणि आईच्या हाती तिरंगा सोपविताना उपस्थितांचे डोळेही पाणावले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com