पक्ष्यांसाठी 10 गुंठे ज्वारी राखीव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

निरगुडसर - निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील निवृत्त प्राचार्य पी. आर. हिंगे यांनी आपल्या १० गुंठ्यांतील तीन महिना कालावधीचे ज्वारी पीक विविध पक्ष्यांना खाद्यासाठी खुले केले आहे. त्यामुळे परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमालीची घटली असून, सध्या उष्णतेचा फटकाही बसत आहे. निरगुडसर येथील शेतकरी नगदी पिकाबरोबर गहू, बाजरी, ज्वारी अशी विविध पिके घेत असतात. पक्ष्यांच्या मदतीसाठी कोण धावणार? त्यामुळे हिंगे यांनी आपल्या शेतातील ज्वारी पक्ष्यांना मोकळी केली आहे. यातून अंदाजे ४ ते ५ पोती (प्रती पोते १०० किलो) याप्रमाणे उत्पादन मिळणे अपेक्षित होते. परंतु हिंगे यांनी उत्पादनाकडे न पाहता सध्याच्या उन्हाळ्यात अन्न-पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या पक्ष्यांना खाद्य उपलब्ध केले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी बाजरी पिकावर पक्ष्यांचे थवेच्या थवे घिरट्या घालत आहेत.

सध्याचा उन्हाळा खूप कडक आहे. त्यामुळे अशा उन्हात मनुष्यालासुद्धा बाहेर पडणे अवघड आहे. अशा वेळी पशुपक्षी उन्हात आपले अन्न, पाणी शोधणार कसे? यामुळे हजारो पक्ष्यांसाठी खाद्य उपलब्ध करून दिले आहे, याचे समाधान वाटते.
- पी. आर. हिंगे, शेतकरी

Web Title: jawar for bird