राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भिगवण येथे सत्कार

प्रा. प्रशांत चवरे
मंगळवार, 1 मे 2018

भिगवण : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नुतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा येथील भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील इंदापुर तालुक्यातील अंर्थुर्णे येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापुर तालुक्यामध्ये आले होते. इंदापुर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवण येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

येथील ग्रामपंचात सभागृहामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंदे, जिल्हा सरचिटणीस डि.एन. जगताप, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच हेमाताई माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, भिगवण शहर अध्यक्ष सचिन बोगावत, शंकरराव गायकवाड, अण्णासाहेब धवडे,  महेश शेंडगे,अजिंक्य माडगे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जयंत पाटील यांनी तालुक्याच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल कार्यकर्यांचे आभार व्यक्त केले.

Web Title: Jayant Patil felicitated in Bhigwan