जयंत सावरकर, निर्मला सावरकर यांना ‘यशवंत-वेणु’ पुरस्कार 

jayant sawarkar nirmala sawarkar to get yashwant venu award
jayant sawarkar nirmala sawarkar to get yashwant venu award

पुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा २०वा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमीदिनानिमित्त कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने सोमवारी २५ नोव्हेंबर २०१९ रोजी नटश्रेष्ठ जयंत सावरकर आणि निर्मला सावरकर यांना ‘यशवंत-वेणु’पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजीत धांडेकर, समीर हंपी यांनी दिली.

कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. पुरस्कार वितरण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, एन. वाय. सी.चे चेअरमन राजेश पांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com