जयश्री जाधव आणि छाया घोडेंना फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार

दत्ता म्हसकर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

जुन्नर - सावरगांव ता.जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका जयश्री जाधव व छाया घोडे यांना फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती वैदयकीय अधिकारी डॉ.एम.बी.भोर यांनी दिली.

परिचारिका जयश्री जाधव यांना आरोग्य सहाय्यिकेचा द्वितीय क्रमांकाचा फ्लोरेंस नाईटींगेल तसेच छाया घोडे यांना तृतीय क्रमांकाचा जीएनएम पदासाठीचा तृतीय क्रमांकाचा फ्लोरेंस नाईटिंगेलं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.   

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. हा समारंभ पुणे जिल्हा परीषदेत पार पडला. 

वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.बी. भोर यांच्या समवेत त्यांनी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, अध्यक्ष विश्वास देवकाते, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते पुरस्काराचा स्विकार केला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: Jayashree Jadhav and chaya ghode Florence Nightingale Award