खंडणी प्रकरण : जयेश कासटचा जामीन फेटाळला

Jayesh Kasat bail was rejected Pune
Jayesh Kasat bail was rejected Pune

पुणे : अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची भीती दाखवून डॉक्‍टरकडून 75 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्याला धमकावून त्याकडून पाच लाख रुपये घेतलेल्या जयेश भगवानदास कासट (वय 42, रा. एरंडवणा) याचा जामीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी फेटाळला.

मधमाश्‍यांच्या हल्ल्यात तेरा विद्यार्थी जखमी

डॉ. हेमंत तुकाराम अडसूळ (वय 55, रा. सहकारनगर) यांनी विश्रामबाग ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 2 ते 6 जानेवारी 2020 या कालावधीत नारायण पेठ आणि सॅलिसबरी पार्क येथे घडली. फिर्यादी यांचा भाऊ मनोज अडसूळने डॉ. दीपक रासने यांच्याकडून 75 लाख रुपये घेतले होते. त्यातील पाच लाख रुपये जयेशने धमकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना कासटने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला; तर फिर्यादीच्या वतीने ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. हितेश सोनार आणि ऍड. दिग्विजय ठोंबरे यांनी काम पाहिले.

''भाजी विकू नको सांगितले'' म्हणून भाजीवाल्याचा आठ पैलवानांसह सोसायटीत राडा

गुन्ह्याचा तपास सुरूच आहे. खंडणीसाठी कोणाची मदत घेतली, याचा शोध सुरू आहे. गुन्ह्यातील पाच लाख रुपये जप्त केले आहेत. त्यावरून प्रथमदर्शनी आरोपीने गुन्हा केल्याचे दिसते. जामीन मिळाल्यास तो तपासात ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, अशी मागणी ऍड. जाधव यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com