'जेईई ऍडव्हान्स' परीक्षा सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

भारतीय तंत्रशिक्षण संस्थांमधील (आयआयटी) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी 'जेईई ऍडव्हान्स' परीक्षा देशभरात आज होत आहे. 

पुणे : भारतीय तंत्रशिक्षण संस्थांमधील (आयआयटी) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी 'जेईई ऍडव्हान्स' परीक्षा देशभरात आज होत आहे. 

यंदा ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, रुरकी यांच्या वतीने घेण्यात येत आहे. परीक्षेतील पेपर क्रमांक-एक सकाळी नऊ वाजता सुरू झाला असून तो दुपारी बारा वाजेपर्यत असेल. परिक्षेतील पेपर क्रमांक-दोन दुपारी दोन ते चार या वेळेत होईल. 

यंदा देशभरातील 11 लाख 47 हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली. या परीक्षेतील दोन लाख 45 हजार विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी जवळपास एक लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्ससाठी अर्ज केलेला आहे.

Web Title: JEE Advanced Education Examination Starts