‘जेईई मेन्स’ परीक्षेचा निकाल ३१ जानेवारीला होणार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

पुणे - देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक असणारी जेईई मेन्स (जॉइंट एंट्रन्स एक्‍झामिनेशन) नुकतीच झाली.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर (एनटीए) परीक्षेची ‘उत्तर सूची’ (अन्सर की) देण्यात आली असून, निकाल ३१ जानेवारीला जाहीर होणार आहे.

जेईई मेन्स ही परीक्षा यंदा दोनदा घेण्याचे केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केले होते. त्याप्रमाणे एनटीएमार्फत पहिली परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात आली.

देशभरातील जवळपास नऊ लाख ४१ हजार ११७ विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात जेईई मेन्स परीक्षा दिली; तर दुसरी परीक्षा ही एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे. जानेवारीत पाच दिवस चाललेली ही परीक्षा जवळपास दहा टप्प्यात (स्लॉट) घेण्यात आली. 

परीक्षेसाठी दहा वेगवेगळ्या प्रश्‍नपत्रिका काढण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेची काठिण्य पातळी समान नसली, तरीही प्रश्‍नपत्रिकेत समान धागाही नव्हता. त्यामुळे यंदा जेईई मेन्स परीक्षेच्या निकालाचे रॅंकिंग हे गुणांवर आधारित नसेल, तर पर्सेन्टाइलवर आधारित असेल. यात ज्या स्लॉटमधील प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडविली असेल, त्याच स्लॉटमधील पर्सेन्टाइल काढले जाणार आहे, अशी माहिती आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी दिली.

जानेवारीमध्ये झालेली जेईई मेन्स परीक्षा दिली आहे, तरीही एप्रिलमध्ये होणारी परीक्षाही देणार आहे. जानेवारीत झालेल्या परीक्षेत गणित आणि रसायनशास्त्राचे प्रश्‍न तुलनेने सोपे होते, तर भौतिकशास्त्राचे प्रश्‍न काहीसे अवघड होते. एनटीएने जाहीर केलेली जेईई मेन्सची उत्तरसूची काहीशी कळायला अवघड आहे.
- मधुरा फणसळकर, विद्यार्थिनी

  एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता
  पुण्यातून जवळपास २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा अंदाज
  जेईई मेन्स दुसरी परीक्षा - ६ ते २० एप्रिल दरम्यान
  जेईई ॲडव्हान्स परीक्षा - १९ मे २०१९

Web Title: JEE Main Exam Result