जेईई, नीटचे तंत्र उलगडले

जेईई, नीटचे तंत्र उलगडले

पुणे -  दहावीनंतर मेडिकल की इंजिनिअरिंग, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यांना मार्गदर्शन  करण्यासाठी सकाळ विद्या, देवधर क्‍लासेस, देवधर्स ॲकॅडमी अँड एक्‍सलन्सतर्फे चर्चासत्र आयोजिले होते. या वेळी ‘जेईई’, ‘नीट’ यांसारख्या प्रवेश परीक्षांचा पाया पक्का करण्यासाठी आत्मविश्‍वासाने अभ्यास करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला.

जेईई आणि नीट परीक्षेची तयारी व अभ्यासांच्या नियोजनाबाबत देवधर क्‍लासेसचे संस्थापक-संचालक प्रा. संदीप देवधर, डॉ. आशुतोष सुळे व प्रा. केदार रिसबूड यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. प्रा. देवधर म्हणाले, ‘‘तुमचे मित्र कसा अभ्यास करतात, यापेक्षा अभ्यासासाठी स्वतःचा पॅटर्न तयार करा. शालेय अभ्यासक्रमातील परीक्षांपेक्षा ‘जेईई’ व ‘नीट’ या परीक्षा वेगळ्या आहेत.  या परीक्षेची तयारी दहावीनंतरच सुरू करावी. अकरावीला प्रवेश घेताना गणित आणि जीवशास्त्राचा जरूर विचार करा. त्यामुळे तुम्हाला पर्याय खुले असतील.’’  
डॉ. सुळे म्हणाले, ‘‘मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्राचा अभ्यास करताना काही सोप्या क्‍लृप्त्या वापराव्यात. त्यामुळे अवघड गोष्टी लक्षात ठेवायला सोपे जाते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा अभ्यास आत्मविश्‍वासाने करावा.’’ 

प्रा. रिसबूड म्हणाले, ‘‘आयआयटी’ ही संस्था गुणवत्तेनुसार प्रवेश देत असल्याने तिथपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नामांकित संस्थेत शिकायचे स्वप्न बाळगून आत्मविश्‍वासाने अभ्यास करा.’’ 

चर्चासत्रातील महत्त्वाचे मुद्दे
अकरावीला गेल्यावर संगत अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे मित्र निवडताना जाणीवपूर्वक निवडा.
राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांची तयारी करताना अभ्यासाची बैठक महत्त्वाची आहे. ती टप्प्याटप्प्याने वाढवा.
पालकांनी पाल्यांना मोबाईल, तसेच व्हॉट्‌सॲप, फेसबुक आदींच्या बळी पडू देऊ नये.
पालक आणि मुलांमधील संवाद कमी झालेला आहे. दहावीनंतरच्या सुटीचा उपयोग हा संवाद वाढविण्यासाठी करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com